गद्दारी कोणी केली? दिग्विजय सिंगांना ज्योतिरादित्य शिंदेंनी दिलं उत्तर

''शिंदे महाराजांनी गद्दारी केली नसती, तर मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार टिकले असते,'' अशा शब्दांमध्ये दिग्विजय सिंग (digvijay singh) यांनी ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांच्यावर निशाणा साधला होता.
गद्दारी कोणी केली? दिग्विजय सिंगांना ज्योतिरादित्य शिंदेंनी दिलं उत्तर
digvijay singh jyotiraditya scindiasarkarnama

भोपाळ : नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग (digvijay singh) यांनी नुकताच जोरदार प्रहार केला आहे. त्याला ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ''शिंदे महाराजांनी गद्दारी केली नसती, तर मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार टिकले असते,'' अशा शब्दांमध्ये दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. ग्वालियरमध्ये येथे एका कार्यक्रमात दिग्विजय सिंग बोलत होते.

''ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमध्ये राहून सगळे लाभ घेतले. त्यांना काँग्रेसने मंत्रीपदे दिली. खासदार केले. हे सगळे लाभ घेतल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. तिथे आता मंत्री झाले आहेत, पण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीच विसरत नाही,'' असा इशारा देखील दिग्विजय सिंग यांनी दिला आहे.

दिग्विजय सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, ''जनता ठरवेल कोण गद्दार आहे अन् कोण नाही, एका व्यक्तीने गद्दारी केली तर पुढच्या पिढ्याही गद्दारी करीत असतात, याला इतिहासात साक्षीदार आहे.'' मी इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकत नाही. जे लोक 'ओसामा, ओसामाजी,' म्हणत होते ते आता जम्मू-काश्मीर येथे पुन्हा ३७० कलम लावण्याची भाषा करीत आहेत. अशा व्यक्तीबाबत न बोलणेच योग्य आहे,''

मध्यप्रदेश भाजचे प्रवक्ते व शिंदे यांचे कट्टर समर्थक पंकज चतुर्वेदी म्हणाले, ‘‘आज दिग्विजय यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीत वाईट गोष्टी लक्षात येत आहेत, पण जेव्हा शिंदे हे कॉग्रेसमध्ये होते तेव्हा दिग्विजय हे त्यांच्या मागे-पुढे फिरायचे. शिंदे यांचे कैातुक करीत होते. मला दिग्विजय यांच्या विचारावर दया येते. गद्दारी तर दिग्विजय आणि कमलनाथ यांनी केली आहे. गद्दारी त्याला म्हणतात, जी तुम्ही आणि कमलनाथ यांनी केली आहे,''

digvijay singh jyotiraditya scindia
ओमायक्रॉनबाबतच्या कडक नियमावलीबाबत अजितदादा म्हणाले..

मध्य प्रदेशातले कमलनाथ सरकार काँग्रेसमधल्या पंधरा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे पडले होते. हे पंधरा आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक होते. त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद हवे होते. परंतु, काँग्रेस नेत्यांनी ते पद दिले नाही त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पासून वेगळी वाट काढत भाजपचा रस्ता धरला. दिग्विजय सिंग यांच्या वक्तव्यामुळे कमलनाथ यांच्या राजकीय जखमेवरची खपली निघाली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वर्षभरात मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्री केले. या राजकीय पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वैयक्तिक टीका केली आहे. त्याच वेळी त्यांनी कमलनाथ यांच्या राजकीय जखमेवरची खपली देखील काढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in