इंधन दरवाढीवर फुंकर...तीन महिन्यांत पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात - diesel priced decreased first time last three months | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

इंधन दरवाढीवर फुंकर...तीन महिन्यांत पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. परंतु, तीन महिन्यांत प्रथमच डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 28 पैसे वाढ करण्यात आली. डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 16 पैसे कपात करण्यात आली. मागील तीन महिन्यांत प्रथमच डिझेलच्या दरात कपात झाली आहे. सध्या देशात इंधनाचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. अर्ध्या देशात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोचला आहे.

दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.19 रुपये तर मुंबई 107.20 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 89.72 रुपये आणि मुंबईत 97.29 रुपयांवर आला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून 40 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे दोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात 10.87 रुपये वाढ झाली आहे. 

हेही वाचा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे जनता वैतागलीय; गडकरींचा सरकारला घरचा आहेर 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 

हेही वाचा : रजनीकांत यांचा अखेर राजकारणाला फुल स्टॉप! 

विशेष म्हणजे नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी 8 जुलैला पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यावेळी पुरी म्हणाले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत मला माहिती घ्यावी लागेल. यासाठी मला थोडा वेळ द्या. मी आताच या मंत्रालयात पाऊल ठेवले असून, इंधन दरवाढीवर  बोलणे योग्य ठरणार नाही.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख