भाजप सहाव्या जागेसाठी वापरणार ‘धक्कातंत्र’ : फडणवीस घेणार अंतिम निर्णय!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि वरिष्ठ नेत्यांशी दीर्घ चर्चा करून संभाव्य नावांबाबत खलबते केली.
devendra Fadnavis
devendra FadnavisSarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभेच्या (Rajya Sabha) १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून (ता. २४ मे) सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit saha) यांनी आज भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. nadda) आणि वरिष्ठ नेत्यांशी दीर्घ चर्चा करून संभाव्य नावांबाबत खलबते केली. या निवडणुकीचा थेट परिणाम आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार आहे, त्यामुळे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने राज्यसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार शहा व नड्डा यांनी मोर्चेबांधणीला सुरवात कली आहे. (Devendra Fadnavis will take final decision regarding the sixth seat of Rajya Sabha)

महाराष्ट्रातील सहा पैकी दोन जागा भाजप हमखास जिंकणार आहे. मात्र, तिसऱ्या जागेसाठीही पक्षाने सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना-संभाजीराजे छत्रपती यांच्यातील ताणाताणीत भाजप ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी ‘धक्कातंत्र' वापरू शकते, अशी दिल्लीत चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहिलेच, तर वेळप्रसंगी त्यांना पाठिंबा द्यावा काय, याबाबतही पक्षात खल सुरू आहे. भाजपचे राज्यातील नेतृत्व म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याबाबतचा ‘अंतिम' निर्णय घेतील असे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत आहे. ता. १० जून रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल.

devendra Fadnavis
निवडणुकीपूर्वीच ओबीसींना आरक्षण मिळेल : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचे वक्तव्य!

राज्यसभेतील ज्या दिग्गजांचा कार्यकाळ आता संपणार आहे, त्यात सभागृह नेते पियूष गोयल, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल व अंबिका सोनी तसेच बसपचे सतीश मिश्रा यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या २४५ जागांपैकी भाजपकडे सध्या ९५ खासदार आहेत, तरी पक्षाचे येथे स्पष्ट बहुमत अजूनही नाही. वरिष्ठ सभागृहात उत्तर प्रदेशचे सर्वाधिक ३४ खासदार असून त्यातील ११ जणांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र-तमिळनाडूतील प्रत्येकी ६ सदस्य निवृत्त होत आहेत. तमिळनाडूतून भाजपला काही आशा नाही. एकूण चित्र पाहता या निवडणुकीनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

devendra Fadnavis
शिवसेनेच्या निर्णयांमध्ये फेरफार : नाराज किशोरी पेडणेकरांचे आयुक्त चहल यांना पत्र!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठीच्या ‘इलेक्ट्रोरल कॉलेज' चे वर्तमान स्वरूप पाहिले तर भाजप आघाडीकडे ४८.९ टक्के हक्काची मते आहेत. कॉंग्रेस व विरोधी पक्षांकडे साधारणतः ५१.१ टक्के मते आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी विरोधकांच्या एकीसाठी कंबर कसली असून विविध विरोधी पक्षीय मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

devendra Fadnavis
कृष्णजन्मभूमी प्रकरणात पूजास्थळ कायदा लागू होणार नाही : मथुरा न्यायालय

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही ते लवकरच चर्चा करणार आहेत. भाजपच्या मर्जीविरूध्द राज्यात जातीनिहाय जनगणनेची घोषणा करण्याचे धक्कातंत्र नितीश यांनी नुकतेच वापरले तरी राष्ट्रपतीपदासारख्या मोठ्या निवडणुकीत नितीशकुमार भाजपची साथ सोडतील, असे राजकीय निरीक्षकांना वाटत नाही. नितीशकुमार केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांना पुन्हा संधी देणार नाहीत; कारण ते दिल्लीत भाजपच्या ‘फारच जवळ' गेले आहेत, अशीही माहिती मिळत आहे.

devendra Fadnavis
एका जागेसाठी काँग्रेसची यादी वाढतच चाललीय! राज्यसभेत यापैकी कोण जाणार?

भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नितीशकुमार यांच्याशी चर्चा करण्यास पाटण्यात पाठविले होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या संपर्कात भाजप नेतृत्व आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी सतत संपर्क साधण्यासाठी एका भाजप नेत्याला सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com