सत्तासंघर्ष नाट्यमय वळणार : फडणवीस-शिंदेंची मध्यरात्री गुजरातमध्ये गुप्त खलबते?

Shivsena | Eknath Shinde : एकनाथ शिंदेंपुढील कायदेशीर पेचावर फडणवीस उपाय सुचविणार?
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political Crisis in Maharashtra
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political Crisis in Maharashtra sarkarnama

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच या संघर्षात एक नाट्मय घडामोड समोर येत आहे. शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा मध्यरात्री अचानक आणि गुप्त गुजरात दौरा झाला असल्याचे वृत्त आहे. रात्री माध्यमांची नजर चुकवून ते गुवाहटी येथील हॉटेलमधून बाहेर पडले आणि विमानतळाच्या दिशेने गेले. त्यानंतर ते पहाटे परत हॉटेलमध्ये दाखल झाले. या दरम्यानच्या वेळेत त्यांचा गुजरात दौरा झाला असल्याचे वृत्त 'एबीपी' माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. (Shivsena | Eknath Shinde Latest News)

याशिवाय राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे देखील रात्रभर मुंबईबाहेर होते. आज पहाटे ते मुंबईत सागर बंगल्यावर दाखल झाले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. शिंदे यांच्या गुजरात दौऱ्याच्या बातमीनंतर याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई बाहेर असण्याशी जोडला जात असून ते देखील रात्री गुजरात दौऱ्यावरच गेले होते का असा सवाल उपस्थित होतं आहे. तसेच या दोघांमध्ये मध्यरात्री गुजरातमध्ये गुप्त बैठक झाली असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यापुढे सध्या कायदेशीर पेच उभा राहिला आहे. शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील तब्बल १६ आमदारांना अपात्रेबद्दल नोटीस पाठविण्यात आली आहे. शिवाय विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडून शिवसेनेच्या गटनेतेपदावर देखील अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच २००३ मध्ये पक्षांतर बंदी कायद्यातील सुधारणेनुसार शिंदे यांना शिवसेनेतून फुटून स्वतंत्र गट म्हणून राहात येणार नसून त्यांना कोणत्याही पक्षात प्रवेश करावा लागणार आहे. (Shivsena | Eknath Shinde Latest News)

यात त्यांच्याकडे भाजप किंवा प्रहार जनशक्ती पक्षाचा पर्याय आहे. जोपर्यंत पक्षांतर करीत नाहीत तो पर्यंत त्यांना शिवसेनेचे सर्व आदेश लागू होतात. याच सगळ्या घडामोडींमुळे शिंदे यांच्यापुढे भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी जाताना येणाऱ्या अडचणींच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बैठकीला काही वरिष्ठ नेतेही उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com