Praful Patel - Sharad Pawar Meet: राष्ट्रवादीत पडद्यामागे मोठ्या घडामोडी ? प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

NCP Crisis: अजित पवारांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली.
Praful Patel and Sharad Pawar
Praful Patel and Sharad PawarSarkarnama

Delhi News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले असून, अजितदादांचा गट सत्तेत, तर शरद पवारांचा गट विरोधी पक्षात आहे. एवढंच नाही तर पक्षाच्या चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहाेचला आहे. असे असतानाच आता अजित पवारांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, या अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीत आहेत. महिला आरक्षणाचे विधेयक मंगळवारी संसदेत मांडण्यात आले. याचवेळी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाल्याची माहिती समोर आली असून, यासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटही केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पडद्यामागे काही घडामोडी घडत आहेत का ? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

काय आहे प्रफुल्ल पटेलांचे ट्विट ?

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची संसदेत भेट झाल्याचे फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "नवीन संसद भवनातील आजचा दिवस ऊर्जेप्रमाणे उत्साहित राहिला. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्याने आणखीनच खास बनला. तसेच कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा, असा आजचा दिवस आहे", असे प्रफुल्ल पटेलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याआधीदेखील दोन वेळा अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची भेट घेतली होती. तसेच शरद पवार आणि अजितदादांची पुण्यातील गुप्त भेट चर्चेत आली होती. यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Praful Patel and Sharad Pawar
India Vs Canada : भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; राजदूताची केली थेट हकालपट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in