राम रहीमला दणका; 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात न्यायालयानं ठरवलं दोषी

विशेष न्यायालयाने 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात गुरमित राम रहीम याला दोषी ठरवले आहे.
राम रहीमला दणका; 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात न्यायालयानं ठरवलं दोषी
Gurmeet Ram Rahim

चंडीगड : साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. आता त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला 12 ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता. विशेष न्यायालय या प्रकरणी 12 ऑक्टोबरला दोषींना शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणात डेरा व्यवस्थापक क्रिशन लाल, शूटर जसबीरसिंग आणि सबदिलसिंग यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. यातील आरोपी इंदर सैन याचा ऑक्टोबर 2020 मध्ये मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात चार दोषींना खून आणि गुन्हेगारी कट आखणे या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच, सबदिल याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी दिली. या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करावी, अशी याचिका पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात करण्यात आली होती. ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

Gurmeet Ram Rahim
भाजप प्रवेशानंतर सहा महिन्यांतच मिथुनदांना मिळालं मोठं गिफ्ट

रणजितसिंग हा डेराचा माजी व्यवस्थापक होता. राम रहीम याच्यावर अनेक साध्वींनी बलात्काराचे आरोप केले होते. त्यावेळी काही साध्वींनी राम रहीम हा लैंगिक अत्याचार करीत असल्याचे निनावी पत्र सगळ्यांना पाठवले होते. यामागे रणजितसिंग याचा हात असल्याचा राम रहीमचा संशय होता. त्यामुळे 10 जुलै 2002 रोजी त्याचा खून करण्यात आला होता. यात राम रहीमसह क्रिशन लाल, जसबीरसिंग आणि अवतारसिंग आणि सबदिल हे आरोपी होते. यातील आणखी एक आरोपी इंदर सैन याचा 8 ऑक्टोबर 2020 रोजी मृत्यू झाला होता.

Gurmeet Ram Rahim
पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्र्याच्या घरावरच चिकटवली नोटीस

रणजितसिंग हा 8 ऑक्टोबर 2020 रोजी त्याच्या वडिलांनी खानपूर कोलियान गावातील शेतात चहा देऊन दुचाकीवरून परतत होता. त्यावेळी 4 जणांनी त्याच्यावर गोळीबार केली आणि ते पळून गेले. यात रणजितसिंग हा ठार झाला. नंतर हल्ला करणारांची ओळख पटली. सबदिल, जसबीर यांच्या यात समावेश होता. यामागील सूत्रधार राम रहीम असल्याचे नंतर तपासात समोर आले आहे.

Related Stories

No stories found.