Tejashwi Yadav ED Raid : दीडशे कोटींचे घर फक्त चार लाखात खरेदी केलं ; तेजस्वी यादव यांच्यावर ED चा आरोप

Tejashwi Yadav ED Raid News update : या बंगल्याची मालकी ही तेजस्वी यादव आणि कुटुंबियाची असल्याचे उघड झाले आहे.
tejaswi yadav
tejaswi yadavsarkarnama

Tejashwi Yadav ED Raid News update : केंद्रीय तपास यंत्रणाने बिहारचे उपमुख्यमंत्री, राजदचे नेता तेजस्वी यादव यांना ED ने समन्स बजावले होते. काल (शनिवारी) त्यांची चौकशी होणार होती. पण तेजस्वी यादव यांनी आपण चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान ईडीने चौकशी दरम्यान दिल्लीच्या एका आलिशान परिसरात एक बंगला जप्त केला आहे. हा बंगला एबी एक्सपोर्टस प्राइवेट लिमिटेड या नावाने नोंदणीकृत आहे.

या बंगल्याची मालकी ही तेजस्वी यादव आणि कुटुंबियाची असल्याचे उघड झाले आहे. या बंगल्याची किमंत दीडशे कोटी रुपये आहे, मात्र हा तो चार लाख रुपयामध्ये खरेदी केला असल्याचे तपासात आढळले आहे.

या बंगल्यात तेजस्वी यादव हे राहत असतात, त्यांचे कार्यालयही या बंगल्यात आहे. २४ ठिकाणी छापेमारी ईडीनं केली.यात ६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे.

ईडीने केलेल्या कारवाईत उपमुख्यमंत्री यादव यांच्या घरातून बेकायदा परकीय चलन, दागिने, इलेक्टाँनिक उपकरणे आढळले आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या, मुलगा तेजस्वी यादव आणि कुटुंबियांकडून 1 कोटी रुपयांची रक्कम, दोन किलो सोने, परकीय चलन, सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.

tejaswi yadav
Land for Jobs Scam: 'जमीन द्या ,रेल्वेत नोकरी मिळवा' ; लालू प्रसाद यादव यांनी असा केला गैरव्यवहार

पत्नीच्या आजारपणाचे कारण देत तेजस्वी यादव यांनी चौकशीला हजर राहणार असल्याचे ईडीला कळविले आहे. त्यांच्या पत्नीची शुक्रवारी बारा तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला होता. तेजस्वी यादव यांची पत्नी गर्भवती आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

tejaswi yadav
Congress : काँग्रेसचे माजी खासदार आर. ध्रुवनारायण यांचे निधन

रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी जमीनच्या बदल्यात रेल्वेत काही जणांना नोकरी दिली होती, याप्रकरणी त्यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे .

१५ मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मीसा भारती यांच्यासह १४ अन्य जणांना १५ मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com