Gyanvapi mosque case : देवबंदच्या परिषदेत मौलाना मदनी यांना अश्रू अनावर..

द्वेषाला प्रेमानेच हरवावे लागेल. देशातील मुसलमान समाज आज अत्यंत विचित्र अवस्थेत जगत आहे.
Gyanvapi mosque case : देवबंदच्या परिषदेत मौलाना मदनी यांना अश्रू अनावर..
Maulana Mahmood Madanisarkarnama

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) वादाच्या पार्श्वभूमीवर देवबंद येथे झालेल्या या परिषदेला मोठी गर्दी झाली होती. शेकडो इस्लामिक विद्वानांनी यात सहभागी होऊन देशातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दलची चिंता व्यक्त केली. याबाबतचा एक प्रस्ताव लवकरच तयार करून देशभरातील मुस्लिम संस्थांना तो पाठविण्यात येणार आहे. (Gyanvapi mosque case news update)

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या निमित्ताने सुरू झालेल्या वादामुळे मुसलमानांना रस्त्याने चालणेही अवघड झाल्याची भावना व्यक्त करताना जमीयत-उलमा-ए-हिंद चे अध्यक्ष व इस्लामिक विद्वान मौलाना महमूद मदनी यांना आज अश्रू अनावर झाले.

मात्र ‘सध्या देशभरात तयार झालेल्या धार्मिक विद्वेषाच्या आगीला प्रेमाचे शिंपण करून हरवावे लागेल' असा संदेश यावेळी देण्यात आला.

Maulana Mahmood Madani
काँग्रेसच्या विजयासाठी तीन आमदारांची कसोटी

"देशातील सध्याचे (विद्वेषाचे) वातावरण व सरकारचे त्यावरील मौन दुःखद आहे. ज्यांना या देशाबद्दल चिंता वाटते त्यांनाच पुढे येऊन यातून देशाला सावरावे लागेल व या फाळणी सदृश्य वातावरणाला संपवावे लागेल. गरज पडली तर आम्ही (न्याय मिळण्यासाठी) जेल भरो आंदोलनही करू," असाही इशारा मदनी यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

मौलाना मदनी म्हणाले, "आम्हाला आमच्याच देशात परकीय-अनोळखी बनविण्यात आले आहे. ‘ते लोक' जो ॲक्शन प्लॅन तयार करत आहेत त्यानुसार आम्हाला जायचे नाही. आम्ही आगीला आगीने विझवू शकत नाही. द्वेषाला प्रेमानेच हरवावे लागेल. देशातील मुसलमान समाज आज अत्यंत विचित्र अवस्थेत जगत आहे,"

Maulana Mahmood Madani
सुजय विखे, पडळकर, राम सातपुते भाजपची तगडी टीम मैदानात उतरणार

"आमच्यासमोर काय अडचणी आहेत हे आमच्यातील प्रत्येक जण जाणतो. ज्या पध्दतीने सारे सुरू आहे ते पहाता मुस्लिमांना तुरूंगात जाण्याचीही तयारी ठएवावी लागेल. मात्र आम्ही आमच्यावरील अन्याय, अत्याचार सहन करू पण आमच्या मातृभूमीवर कोणतेही संकट येऊ देणार नाही, हाच ‘जमीयत' या संदेश आहे. हा कमकुवतपणा नाही तर ती ताकद आहे. आम्ही प्रत्येक बाबतीत समझोता करू, पण आमच्या निष्ठएबरोबर (इमान) समझओता करू शकत नाही. या परिस्थितीतही आम्ही निराश होऊ नये असा रस्ता आमचे हे ‘ईमान'च आम्हाला दाखवेल," असे मदनी म्हणाले. (jamiat ulama e hind muslims conference gyanvapi masjid case deoband)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in