"५००-१००० च्या नोटा झटक्यात रद्द करण्याची आयडिया माझी नव्हती"

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अनिल बोकील यांनीच नोटबंदीची आयडिया त्यांना दिली होती.
500-1000 notes and Anil Bokil
500-1000 notes and Anil BokilSarkarnama

पुणे : भारतातील नोटबंदीला (Demonization) आज ५ वर्ष पुर्ण होत आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता लाईव्ह येत मोदींनी ही ऐतिहासिक घोषणा केली होती. अचानक चलनातुन ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काढून टाकण्यात आल्या. तसेच २००० रुपयांची नवी नोट चलनात आणण्यात आली. ऐनवेळी केलेल्या या घोषणेमुळे देशवासींना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची टीका अनेक जेष्ठ अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Dr. Manmohan singh) यांच्यापासून अनेक अर्थतज्ञांनी केली होती.

पण आता ५००-१००० च्या नोटा एकदम काढून टाकण्याची आयडिया पंतप्रधान मोदींना मी दिली नव्हती असा दावा जेष्ठ अर्थतज्ञ आणि नोटबंदी कल्पनेचे प्रणेते मानले गेलेले अनिल बोकील (Anil Bokil) यांनी केला आहे. तसेच नोटबंदी यशस्वी झाली असून देशात डिजीटायजेशन, परकीय गुंतवणूक यामध्ये मोठी वाढ झाला असल्याचा दावाही बोकील यांनी केला आहे. दैनिक भास्कर या हिंदी वृत्तपत्राला नोटबंदीच्या ५ वर्षानिमित्त दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये ते बोलत होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बोकील यांनी नोटबंदीची आयडिया त्यांना दिली होती.

500-1000 notes and Anil Bokil
मी नरेंद्र दामोदरदास मोदी...! सात वर्षांतील सात मोठ्या घटना...नोटबंदी ते कोरोना

अनिल बोकील म्हणतात, आज जगभरात डिजिटल अर्थव्यवस्था वाढत आहे. यामुळेच भारतही आज प्रगतीपथावर आहे, आणि आधीपेक्षा यात बराच चांगला फरक पडला आहे. व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढली आहे. लोकांचा मागोवा घेणे आता सोपे झाले आहे. नोटाबंदीनंतर देशातील सावकारी ठप्प झाली आणि व्याजदर कमी झाले. व्हाईटमध्ये मनीचा वापर वाढल्यामुळे आज बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध आहे. यापूर्वी चलनी नोटांमुळे व्यवहारांचा मागोवा घेणे अवघड होते. भारतात डिजीटल अर्थव्यवस्था असल्यामुळेच परकिय गुंतवणूकीतही वाढ होत आहे. त्यामुळे नोटबंदीशिवाय दूसरा कोणताच मार्ग नव्हता.

तसेच नोटबंदीनंतर छोट्या नोटांची गरज नसल्याचे सिद्ध झाले आहे. इथून पुढेही लहान नोटा चलनात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातील तसे खोट्या नोटांमध्ये असलेले चलन कमी होईल, असा आशावादही बोकील यांनी व्यक्त केला आहे. नोटाबंदीनंतर नक्षलवाद आणि दहशतवादाला आळा बसला आहे. पूर्वी त्यांना सहज निधी मिळत असे. पण आता तसे होत नाही. काश्मीरमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसून आला असल्याचेही ते म्हणाले. भारताने आज जीडीपीमध्ये ज्या पद्धतीने गती पकडली आहे, त्यासाठी बोकील यांनी डिजीटायजेशनलाच जबाबदार मानले आहे.

500-1000 notes and Anil Bokil
नोटबंदीने सात लाख कोटींचा कर वाचेल- तावडे

बोकील यांनी दैनिक भास्करशी बोलताना एक खंतही व्यक्त केली आहे. ते म्हणतात, सरकारने आमचा ५ कलमी प्रस्ताव मान्य केला नाही. कदाचित सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेली काही आश्वासने पाळायची असतील. पण आम्ही टॅक्सलेस कॅश इकोनॉमीबद्दल बोलत होतो. आमचा प्रस्ताव जीपीएस सिग्नलसारखा होता. यात आम्ही सरकारला केवळ एक बरोबर मार्ग दाखवला. जसे गाडीत बसल्यानंतर जीपीएस यंत्रणा तुम्हाला योग्य मार्ग दाखवते तसेच काहीसे काम आम्ही आमच्या प्रस्तावात केले आहे.

बोकील यांनी या मुलाखतीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काढून टाकण्यावरही भाष्य केले. ते म्हणतात, नोटबंदीचे फायदे-तोटे या बद्दलचे सगळे साधक-बाधक मुद्दे आम्ही पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक केले आहेत. पण ५०० आणि १००० च्या नोटा एका झटक्यात काढून टाका असे मी कधीच म्हटले नव्हते. जर फक्त १००० च्या नोटा काढल्या असत्या तर ३५ टक्कांची तफावत राहिली असती. नवीन ५०० रुपयांच्या नोटा वाढवल्या असत्या तर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणाव्या लागल्या नसत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in