पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाईची मागणी, आझादांची घेतली होती भेट

Pruthviraj Chavhan : राहुल गांधीवर प्रश्न उपस्थित केल्याने, सचिव वीरेंद्र वशिष्ठ यांची कारवाईची मागणी
Pruthviraj chavan|
Pruthviraj chavan|Sarkarnama

दिल्ली : नुकतीच कांग्रेस पक्षावर जाहीर टीका करत पक्षाचा राजीनामा गुलाम नबी आझाद यांनी दिला होता. राजीनामा दिल्यानंतरही कांग्रेसच्या काही नेत्यांनी आझाद यांची भेट घेतली होती. यामुळे कांग्रेसमध्ये एक गट नाराज आहे. कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विपरीत भाष्य केल्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. मंगळवारी (30 अॉगस्ट) हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, आनंद शर्मा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आझाद यांची भेट घेतली होती. यावरूनच काँग्रेस अंतर्गत धूसफूस सुरू झाली आहे. या भेटीमुळे या तीन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी दिसून येत आहे.

Pruthviraj chavan|
जानकरांना हवंय कॅबिनेट मंत्रीपद : सोबत घ्यावे की नाही ते भाजपने ठरवावं

राहुल गांधी यांच्यावर प्रश्न उपस्थित केल्याने, इंडियन ओवरसीज कांग्रेसचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना घेरले आहे. पक्ष शिस्तपालन समितीचे प्रमुख तारिक अनवर यांना ई-मेल पाठवून वशिष्ठ यांनी तक्रार केली आहे. "कांग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या संदर्भात चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यांकडे तुमचे लक्ष वेधू इच्छीतो. राहुल गांधी यांच्या विरोधात खोटे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे." असा ई-मेल वशिष्ठ यांनी पाठवला आहे.

Pruthviraj chavan|
'ये मीठा है, ओ कडू है', बच्चू कडूंबद्दल सत्तार असे का म्हणाले, करावं लागल स्पष्ट

आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भूपेंद्र सिंह हुड्डा देखील होते. यामुळे कांग्रेस वर्किंग कमेटीच्या सदस्या कुमारी शैलजा यांनीही ऑल इंडिया कांग्रेस कमेटीकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी वरिष्ठ नेत्यांविरूद्ध कारणे दाखवा नोटिसाची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in