पोलिस महिला अधिकाऱ्यावर सोपवली दिल्लीतील महत्वपूर्ण जबाबदारी...

मोनिका भारव्दाज यांच्या नियुक्तीमुळे पोलिस दलातील अन्य महिला पोलिसांमध्ये उत्साह वाढणार आहे.
monika.jpg
monika.jpg

नवी दिल्ली : आयपीएस अधिकारी मोनिका भारव्दाज यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे. 2009 बॅचच्या आयपीएस अधिकारी मोनिका भारव्दाज यांची दिल्ली गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी एका महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करणं ही दिल्ली पोलीस दलातील पहिली घटना आहे. 

दिल्लीच्या अन्य पोलिस अधिकाऱ्याच्या मते मोनिका भारव्दाज यांच्या नियुक्तीमुळे पोलिस दलातील अन्य महिला पोलिसांमध्ये उत्साह वाढणार आहे. पण मोनिका भारव्दाज यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत. कारण दिल्ली गुन्हे शाखेची काम करण्याचे पद्धत वेगळी आहे. या विभागाचा तपासावरच सर्व लक्ष केंद्रीत केलं जातं 

मोनिका भारव्दाज यांच्या निवडीबाबत महिला आयपीएस असलम खान यांनी सांगितलं की भारव्दाज या एक महिला अधिकारी आहेत. पहिली महिला अधिकारी असं म्हणणं चुकीचं आहे. असा भेदभाव करू नये. आम्ही सर्व अधिकारी आहोत. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आम्ही खूप परिश्रम करतो. 

असलम खान या नॅार्थ वेस्ट दिल्लीच्या उपायुक्त होत्या. आता त्या पोलिस विकास व संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते मोनिका भारद्वाज यांनी तीस हजारी हत्याप्रकरण तपासात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. यासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. कारण गुन्हे शाखेची जबाबदारी ही मोठी जबाबदारी असते. कारण येथे फक्त तपास करणं महत्वाचं नसते तर कुख्यात गुंडांशी सामना करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असतं. 

अनेक वर्षापासून एखाद्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी ही महिला अधिकाऱ्याला दिली जात नव्हती, कारण गुन्हेगार, अतिरेकी यांना पकडणे, एनकांउटर करणे आदी जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर असते. म्हणून आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी दिलेली नव्हती. पहिल्यांदाच मोनिका भारव्दाज यांची या महत्वपूर्ण विभागाच्या जबाबदारी दिली आहे. 
Edited  by : Mangesh Mahale


हेही वाचा : आत्मसन्मान असेल तर काँग्रेस सोडा..ओवैसी यांचा आझाद यांना सल्ला 
नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वावरून काँग्रेसमधील सुरू असलेला अंतर्गत वादावर आता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टिका केली आहे. एआईएमआईएमच्या ऑनलाइन रैलीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ओवेसी यांनी राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यावर टिका केली आहे. आजाद यांनी काँग्रेस पक्ष सोडावा, असे ओवेसी यांनी म्हटलं आहे. "तुमच्यात आत्मसन्मान असेल लवकरच पक्ष सोडा," असा सल्ला असदुद्दीन ओवैसी यांनी गुलाम नबी आजाद यांना दिला आहे. ओवेसी म्हणाले की आजाद यांनी एआईएमआईएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. आज काँग्रेसलाच लोक भाजपची कठपुतली म्हणतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com