मोठी बातमी : दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला...दोघांचं पाकिस्तानात प्रशिक्षण

एकाला महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
मोठी बातमी : दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला...दोघांचं पाकिस्तानात प्रशिक्षण
Delhi Police Special Cell busts Pak organised terror module

नवी दिल्ली : देशभरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसह दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं सहा जणांना अटक केली आहे. त्यानंतर हा कट उघडकीस आला आहे. त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर विस्फोटक आणि हत्यारं सापडली आहेत. यापैकी एकाला महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आलं आहे. (Delhi Police Special Cell busts Pak organised terror module)

दहशतवादी कटाबाबत माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काही राज्यांमध्ये छापेमारी केली आहे.  दिल्लीसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान व अन्य काही राज्यांमधून पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेतलं. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलं असून त्यांची नावे ओसामा व जिशान अशी आहेत. 

ते दोघं एप्रिल महिनयात मस्कतला गेले होते. त्यांना जहाजानं पाकिस्तानला नेण्यात आलं. तिथं त्यांना एका फार्म हाऊसमध्ये विस्फोटक बनवणं आणि एके 47 बंदूक चालविण्याचं 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं, अशी माहिती दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली.

ठाकूर म्हणाले, आम्हाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरूवातीला महाराष्ट्रातून सलेमला ताब्यात घेण्यात आलं. तर दोघांना दिल्लीत पकडण्यात आलं. त्यांतर उत्तर प्रदेशातून तीन जणांना अटक करण्यात आली. पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्यानंतर दोघेजण पुन्हा मस्कतमध्ये आले. मस्कतमधून 15 बांग्ला बोलता येणाऱ्यांना पाकिस्तानात नेण्यात आलं. त्यांनाही प्रशिक्षण दिलं असावं, अशी शक्यता आहे. त्यांच्या दोन टीम बनवण्यात आल्या होत्या. 

एका टीमशी अनिस इब्राहीम समन्वय साधत होता. सीमेपलीकडून आलेल्या हत्यारांना विविध राज्यांत पाठवणं, हे त्यांचं काम होतं. तर हवालाच्या माध्यमातून पैसे जमविणे, हे दुसऱ्या टीमचं काम होतं, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. पोलिसांनी सहा जणांना अटक केल्यानं मोठा कट उधळून लावण्यात यश आलं आहे. विविध राज्यांमध्ये साखळी बाँबस्फोट घडविण्याचा त्यांचा उद्देश होता, असंही समोर आलं आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in