Rahul Gandhi news : राहुल गांधींच्या घरावर दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; भारत जोडो यात्रेशी आहे संबंध

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.
Rahul Gandhi news :
Rahul Gandhi news :Sarkarnama

Rahul Gandhi news : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता राहुल गांधीं यांच्या दिल्लीतील घरावर दिल्ली पोलिसांच्या पथकाने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. (Delhi Police raid on Rahul Gandhi's house; It is related to Bharat Jodo Yatra)

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राहुल गांधींच्या यांच्या वक्तव्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. पण राहुल गांधींनी या नोटीसीला उत्तर न दिल्यामुळे दिल्ली पोलिसांचे एक पथक आज सकाळीच त्यांच्या घरी पोहचले. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) घरावर होणाऱ्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Rahul Gandhi news :
Ramdas Athawale; ‘सतत जे म्हणतात खोके त्यांचे फिरलय डोके’

आजही महिलांचे शोषण होत आहे, भारत जोडो यात्रेत अशा अनेक महिला आपल्याला भेटल्या, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी श्रीनगरमध्ये बोलताना केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवून या महिलांची माहिती देण्यास सांगितले होते. पण राहुल गांधींनी त्यांच्या नोटीसीला उत्तर न दिल्यामुळे आज सकाळीच दिल्ली पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहचले. (BJP-Congress Politics)

विशेष पोलिस आयुक्त सागर प्रीत हुड्डा म्हणाले की, "आम्ही येथे राहुल गांधींशी बोलण्यासाठी आलो आहोत. राहुल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये विधान केले होते की, भेटीदरम्यान ते अनेक महिलांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर अशा पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना माहिती गोळा करण्यासाठी आपण इथे आलो आहोत..पोलिसांनी 15 मार्चला या प्रकरणाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला पण 'अपयश' आले त्यानंतर आम्ही त्यांना 16 मार्चला नोटीस पाठवली होती. (National Political news)

दिल्लीतील त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला मात्र अशी कोणतीही महिला सापडली नाही.आम्ही आधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता पण राहुल गांधी परदेशात असल्याने भेटू शकले नाहीत. पोलिसांनी लवकरात लवकर ही माहिती घ्यावी, जेणेकरून पीडितांना कोणतीही अडचण येऊ नये, ही माहिती घेण्यासाठी आम्ही येथे आलो असल्याचंही सागर हुड्डा यांनी सांगितलं.

दरम्यान, या कारवाईनंर ''आम्ही नियमानुसार प्रतिसाद देऊ, पण अशा प्रकारे येणं हे कितपत योग्य आहे?भारत जोडो यात्रा संपून 45 दिवस झाले आणि आज हे असे प्रश्न विचारत आहे. यावरून सरकार घाबरले आहे हे दिसून येते.मला आतमध्ये येण्यापासून रोखण्यात आले, हा रस्ता का बंद करण्यात आला,असे सवाल कॉंग्रेस नेते पवन खेडा यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in