भाजपच्या एका नेत्यासाठी तीन राज्यांचे पोलीस आमनेसामने; तब्बल सात तास 'भागमभाग'

सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही भागमबाग तब्बल सात तास सुरू होती. अखेर यात दिल्ली पोलिसांनी बाजी मारली.
Tajinder Pal Singh Bagga latest news Update
Tajinder Pal Singh Bagga latest news UpdateSarkarnama

नवी दिल्ली : भाजपच्या एका नेत्यासाठी शुक्रवारी तीन राज्यांचे पोलीस आमनेसामने आले. तब्बल सात तासांच्या या घडामोडींमध्ये अनेक ट्विट आले. अगदी चित्रपटाला लाजवेल, अशा घटनांनी तीन राज्यांच्या पोलीस यंत्रणेचा जणू कस लागला. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही भागमबाग तब्बल सात तास सुरू होती. अखेर यात दिल्ली पोलिसांनी बाजी मारली. (Tajinder Pal Singh Bagga latest News Update)

ज्या नेत्यासाठी तीन राज्यांची पोलीस कामाला लागली होती, त्यांचं नाव आहे तेजिंदर पाल सिंग बग्गा. ते दिल्ली भाजपचे (BJP) प्रवक्ते आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी पंजाब (Punjab) पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंजाबचे पोलीस दिल्लीतील जनकपुरी येथील बग्गा यांच्या घरी सकाळी सव्वा आठ वाजता पोहचले. (BJP leader Tajinder Pal Bagga being brought back to Delhi)

Tajinder Pal Singh Bagga latest news Update
ठाकरे सरकारला मोठा दिलासा; बहुसदस्यीय प्रभाग रचनेवर न्यायालयाची मोहोर

बग्गा यांना अटक करून पंजाबचे पोलीस मोहालीच्या दिशेने निघाले होते. परंतु बग्गा यांना अटक केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामध्ये मग दिल्ली व हरयाणा पोलिसांची एन्ट्री झाली. बग्गा यांच्या वडिलांनी मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या बग्गा यांना घेऊन जाणाऱ्या गाड्या कुरुक्षेत्रमध्ये अडवल्या. यादरम्यान हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना आपण बग्गा यांना दिल्ली पोलिसांकडे सोपवणार असल्याचे जाहीर केले.

पंजाब पोलिसांच्या विनंतीनंतरही हरयाणा पोलिसांना त्यांना जाऊ दिले नाही. पंजाब पोलिसांनी हरयाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यासोबत एफआयआरची कॉपीही जोडली. हे अपहरणाचे प्रकरण नाही. हरयाणा पोलिसांनी विनाकारण अडवले आहे, असा दावा पंजाब पोलिसांनी पत्रात केला. पण त्यानंतर हरयाणा पोलिसांनी त्यांना सोडले नाही. यावेळी दिल्लीचे पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बग्गा यांना आपल्या ताब्यात घेऊन दिल्लीला नेले. त्यामुळे पंजाब पोलिसांना हात हलवत परत जावे लागले. सुमारे सात तास हा घटनाक्रम सुरू होता.

का केलं बग्गा यांना अटक?

बग्गा यांच्याविरोधात आपचे नेते सनी सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून पंजाब पोलीस बग्गा यांच्या शोधात होती. याआधीही पोलीस दिल्लीत आले होते. पण त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. बग्गा यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. केजरीवाल हे काश्मीरी पंडितांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in