खबरदार! मोदींच्या विरोधात पोस्टर पडेल महागात; 17 जणांना खावी लागली तुरुंगाची हवा

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात मोठ्या प्रमाणात लशीची टंचाई निर्माण झाली आहे.
delhi police arrest 12 persons over posters against narendra modi
delhi police arrest 12 persons over posters against narendra modi

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, देशात मोठ्या प्रमाणात लशीची टंचाई निर्माण झाली आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपचे सरकार (BJP government) टीकेचे धनी बनले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या विरोधात पोस्टर लावणे 17 जणांना महागात पडले आहे. त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे. 

मागील काही दिवसांत दिल्लीत अनेक ठिकाणी मोदींवर टीका करणारी पोस्टर लावण्याचे सत्र सुरू आहे. कोरोना संकटाच्या हाताळणीत मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका देशात तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. दिल्लीत अशा प्रकारची पोस्टर लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाईची पावले उचलली. 

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 21 पेक्षा जास्त एफआयआर दाखल केले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई करीत आतापर्यंत 17 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 800 पोस्टर जप्त केली आहेत. या पोस्टरवर लिहिले होते की, मोदीजी, आपने हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दी? 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com