Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal
Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwalsarkarnama

भाजपने डाव साधला; अरविंद केजरीवालांना दिल्लीतच गुंतवून ठेवले

Gujarat election : दिल्ली महापालिकेच्या निवडणुका जाहीर

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) भाजप (BJP) विरोधात चांगलीच आघाडी उघडली आहे. मात्र, आज दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एमसीडीची निवडणूक ४ डिसेंबरला होणार आहे. ७ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दिल्ली राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

त्यामुळे गुजराज (Gujarat) निवडणुकीमध्ये ताकद पणाला लावणाऱ्या आपची अडचण झाली आहे. कारण आता आपला दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतही लक्ष घालावे लागणार आहे. त्यामुळे गुजरातकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. यामुळेच दिल्ली महापालिकेच्या तारखा जाहीर केल्याचा, आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal
केजरीवाल यांचा पंजाब पॅटर्न गुजरातमध्ये यशस्वी ठरणार का?

दिल्ली निवडणुकीची 7 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयुक्त डॉ. विजय देव यांनी सांगितले. त्याच वेळी, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर असणार आहे. गुजरातच विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचीही मतमोजणी होणार आहे. तर दिल्ली महापालिकेची मतमोजणी 7 डिसेंबरला होणार आहे.

Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal
Gujarat Assembly Elections : आम आदमी पक्षाने जाहीर केला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

गुजरात आणि दिल्ली महापालिकेची निवडणूक एकाच वेळी जाहीर झाल्यामुळे आपची कसरत होणार आहे. त्यांना आपली संपूर्ण ताकद दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत लावाली लागणार असल्याचे गुजरातमध्ये दमछाक होणार आहे. यामुळे भाजपने आपलचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

दिल्ली आणि गुजरात निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असली तरी भाजप आणि काँग्रेसकडे मोठी प्रचार यंत्रणा आहे. तसेच नेत्यांची संख्या अधिक असल्यामुळे ते दोन्ही निवडणुकीमध्ये प्रचार करु शकतात. मात्र, आपची प्रचार यंत्रणा तुलनेने कमी आहे. त्यातच महत्वाच्या नेत्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही अधीक लक्ष घालावे लागणार आहे. त्यामुळे भाजपने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्लीत अडकवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com