Delhi Government Transfer Officials: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ; ९९ अधिकाऱ्यांच्या बदल्या..

Delhi Government News : आता हे अधिकार निवडून आलेल्या सरकारकडे आहेत .
Arvind Kejriwal News:
Arvind Kejriwal News:Sarkarnama

Delhi Government News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (delhi government transfers 99 jail officials after sc verdict)

केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी पहिल्यांदा प्रशासकीय विभागाचे सचिव आशीष मोरे यांची हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांनी कारागृहाच्या ९९ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्याचे आदेशही केजरीवाल सरकारनं दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर प्रशासकीय विभागाचे मंत्री सौरभ भारव्दाज, या विभागाचे सचिव आशीष मोरे यांना पदावरुन हटवलं आहे. आशीष मोरे यांच्या जागी १९९५ बॅचचे सनदी अधिकारी अनिल कुमार सिंह यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन नेहमीच वाद झाले आहेत. यापूर्वी बदल्यांचे अधिकाऱ्यांवर उपराज्यपाल यांचे नियंत्रण होते. पण काल सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानं आता हे अधिकार निवडून आलेल्या सरकारकडे आहेत .

Arvind Kejriwal News:
Delhi Govt Vs LG : दिल्ली केजरीवालांचीच ! ; न्यायालयाचा मोदींना दणका ; बदल्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडून आलेल्या..

दिल्लीमध्ये निवडणूक आलेल्या सरकारला प्रशासकीय सेवांवर अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल न्यायालयानं दिला आहे.त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांचा बदल्या आणि त्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार दिल्ली सरकारकडे असेल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांवर दिल्ली सरकारचाच अधिकार, नियंत्रण असावे, असे न्यायालयाचे मत न्यायालयानं नोंदवले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि एलजीच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असला तरी त्याला जमीन, पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्थेबाबतचा अधिकार केंद्र सरकारला असेल, असे न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे.

Arvind Kejriwal News:
Maharashtra Poltical Crisis: तेव्हा कुठे गेली होती तुमची नैतिकता?; न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेले अनेक निर्णय नायब तहसिलदार यांनी रोखून धरले होते. यावरुन केजरीवाल सरकार आणि नायब तहसिलदार यांच्यात नेहमी वाद झाले आहेत. हा वाद न्यायालयात पोहोचला होता. दिल्ली आम आदमी पार्टी आणि एलजी विनय कुमार सक्सेना यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com