ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देशात सर्वाधिक होताच दिल्ली सरकारचे कडक निर्बंध

कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढले आहे.
ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देशात सर्वाधिक होताच दिल्ली सरकारचे कडक निर्बंध
Omicron Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढले आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 213 झाली आहे. सर्वाधिक रुग्ण दिल्लीत आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सरकारला तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले होते. यामुळे दिल्ली सरकारने लगेचच पावले उचलत कठोर निर्बंध घातले आहेत.

दिल्ली सरकारने नाताळ आणि नववर्षाच्या सर्व जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. कोरोनाचा जास्त प्रसार होणारे विभाग निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल आणि नागरिक मास्क वापरतील, यावर देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील सर्वेक्षण करावयाचे आहे. या भागात गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा अशी संसर्ग जास्त पसरणारी ठिकाणे निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. तेथे तातडीने उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकार यामुळे खडबडून जागे झाले आहे. पंतप्रधान मोदींना यासाठी तातडीने आढावा बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या (ता.23) होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार संसर्ग रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Omicron
विरोधकांना मोठा धक्का! अधिवेशनात आता तेरावा सदस्य निलंबित

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णसंख्येने आता दोनशेचा टप्पा पार केला आहे. यातील 77 रुग्ण बरे झालेले आहेत. सर्वाधिक रुग्ण दिल्लीत 57 आहेत. यानंतर महाराष्ट्र 54, तेलंगण 24, कर्नाटक 19, राजस्थान 18, केरळ 15 आणि गुजरात 14 अशी रुग्णसंख्या आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 317 नवीन रुग्ण सापडले. देशातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची 3.48 कोटी आहे. सध्या सक्रिय रुग्ण 78 हजार 190 आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 318 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 4.78 लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Omicron
निलंबित होताच सदस्यानं सरकारलाच आणलं अडचणीत

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, अशी माहिती नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने केंद्र सरकारला दिली आहे. या समितीचे अध्यक्ष हे प्रा. विद्यासागर हे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल. सध्या देशात दररोज कोरोनाचे साडेसात हजार रुग्ण सापडत आहेत. डेल्टाच्या जागा ओमिक्रॉनने घेतल्यानंतर ही संख्या वाढेल.

Related Stories

No stories found.