Delhi acid attack news : दिल्लीत शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

Delhi Girl Acid Attack : दिल्लीतील द्वारका मोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन मुलांनी एका शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला केला.
Delhi Girl Acid Attack
Delhi Girl Acid Attack Sarkarnama

Delhi Girl Acid Attack : देशाच्या राजधानीत धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत महिलांसोबत विनयभंग आणि गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दिल्ली (Delhi) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका मोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन मुलांनी एका शाळकरी मुलीवर अॅसिड फेकले. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरूणीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही घटना स्थळावर पोहोचले.

Delhi Girl Acid Attack
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या राजा पटेरियाला होऊ शकते 'ही' शिक्षा, अजामीनपात्र कलमांतर्गत कारवाई!

दिल्ली पोलिसांना (Police) मोहन गार्डन परिसरात एका विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७:३० च्या सुमारास एका १७ वर्षीय मुलीवर दोन दुचाकीस्वार तरुणांनी येऊन अॅसिड हल्ला केला.

घटनेच्या वेळी पीडीत मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत रस्त्याच्या कडेला उभी होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी कारवाई करत एका मुलाला ताब्यात घेतले आहे.

लहान बहिणीने सांगितले की दोन दुचाकीस्वार मुले तिच्या ओळखीची आहेत. एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी हे अॅसिड कोठून आणले होते, याचाही शोध पोलिस घेत आहेत. विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

Delhi Girl Acid Attack
Rajasthan News : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोतांना 'चिरंजीवी'कडून अपेक्षा; काँग्रेस लागली कामाला

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी विद्यार्थिनीवरील अॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ द्वारका वळणावर एका शाळकरी मुलीवर अॅसिड फेकण्यात आले. पीडितेच्या मदतीसाठी आमची टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. मुलीला न्याय मिळेल. दिल्ली महिला आयोग अनेक वर्षांपासून देशात अॅसिडवर बंदी घालण्यासाठी लढा देत आहे. सरकारला जाग कधी येणार?” असा सवाल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com