CBI नंतर आता सिसोदियांवर ED चा छापा पडणार ? ; PMLA अंतर्गत लावली 2 कलमे

Manish Sisodia : येत्या 1-2 दिवसांत या प्रकरणात ईडीची एन्ट्री होऊ शकते.
Manish Sisodia
Manish Sisodiasarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री (Delhi Deputy CM) मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची दारु घोटाळा प्रकरणात सीबीआयने काल (शुक्रवारी) पंधरा तास चौकशी केली. या चौकशीत त्यांच्याकडे अनेक महत्वाची कागदपत्रे आढळली आहेत. (Manish Sisodia latest news)

या छापेमारीमध्ये सीबीआयने अनेक कागदपत्रे, फोन, लॅपटॅाप, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर बऱ्याच गोष्टी जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

मनीष सिसोदिया यांच्यासह 15 जणांना सीबीआयने एफआयआरमध्ये आरोपी केले आहे. उर्वरित आरोपींमध्ये दिल्लीचे उत्पादन शुल्क आयुक्त अरुण गोपी कृष्णा, उप उत्पादन शुल्क आयुक्त आनंदकुमार तिवारी, सहायक उत्पादन शुल्क आयुक्त पंकज भटनागर, 9 व्यापारी आणि दोन कंपन्यांचा समावेश आहे.

Manish Sisodia
CBI Raid : सिसोदिया यांची पंधरा तास चौकशी ; लॅपटॅाप, मोबाईल जप्त

याशिवाय एफआयआरमध्ये 16 क्रमांकावर अज्ञात सरकारी सेवक आणि खासगी व्यक्तीचा उल्लेख आहे. म्हणजेच तपास यंत्रणा एफआयआरमध्ये आणखी काही लोकांची नावे समाविष्ट करू शकते.

आता लवकरच या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) एंट्रीही होऊ शकते. मनीष सिसोदिया यांच्यावर 3 कलमे लावण्यात आली आहेत, त्यापैकी 2 कलमे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) येतात. येत्या 1-2 दिवसांत या प्रकरणात ईडीची एन्ट्री होऊ शकते, असे मत ईडीचे माजी उपसंचालक सत्येंद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे.

सीबीआयच्या एफआयआरनुसार, मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 120B, 477A आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी, ईडी आयपीसीच्या कलम 120बी आणि पीसी कायद्याच्या कलम 7 या दोन्हींवरील तपासात सामील होऊ शकते. ही दोन्ही कलमे पीएमएलए अंतर्गत अनुसूचित गुन्ह्यांमध्ये येतात. अशा प्रकरणांमध्ये ईडी तत्काळ कारवाई करते.

१६ जणांविरोधात गुन्हे

गेल्या नोव्हेंबरमध्ये केजरीवाल सरकारने नवे उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. त्याअंतर्गत मद्यविक्रीचा परवाना खासगी ठेकेदारांना देण्यात आला होता. मात्र, हे धोरण ३० जुलै रोजी मागे घेण्यात आले. त्यानंतर या मद्यविक्री धोरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात होता. दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या अहवालानंतर नायब राज्यपाल विनय सक्सेना यांच्या आदेशानंतर या प्रकरणी ‘सीबीआय’ने सिसोदिया यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com