Manish Sisodiya Arrest : सिसोदियांच्या अटकेनंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; दिला 'हा' इशारा..

Arvind Kejriwal : सिसोदियांच्या अटकेनंतर दिल्लीचे राजकारण तापले
Arvind Kejriwal and Manish Sisodiya
Arvind Kejriwal and Manish SisodiyaSarkarnama

Manish Sisodiya : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोट्याळ्याप्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या तपासात सिसोदिया सहकार्य करत नसल्याचे सांगत त्यांना अटक करण्यात आली. सिसोदिया यांच्या अटकेनंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.''मनीष सिसोदिया हे निर्दोष असून जनता याचे उत्तर देईल. यामुळे आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल'' , असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं की, ''मनीष निर्दोष आहे. त्यांची अटक म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र, प्रत्येकजण हे पाहत आहे. लोकांना सर्व समजतं असून लोक याला उत्तर देतील. पण यामुळे आमचे मनोबल आणखी वाढेल. आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल'', असं ट्विट त्यांनी केलं आहे.

केजरीवाल सरकारने 2021 मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण तयार केले होते. त्यामध्ये कथित घोटाळ्याचा आरोप सिसोदिया यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान, सिसोदिया यांच्या अटकेनंतर दिल्लीचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in