केजरीवालांचे ‘दिल्ली मॉडेल’ सिंगापूरला जाणार पण मोदी सरकारची परवानगी मिळेना!

दिल्लीतील आरोग्य, शिक्षण व इतर सुविधांमध्ये अनेक बदल केल्याचा दावा केजरीवालांकडून केला जातो.
DM Arvind kejriwal Latest News & PM Narendra Modi Latest Marathi News
DM Arvind kejriwal Latest News & PM Narendra Modi Latest Marathi News Sarkarnama

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या दिल्लीतील शिक्षण, आरोग्य, वाहतूक अशा विविध विभागांमध्ये अनेक सुधारणा झाल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) करत असतात. ‘दिल्ली मॉडेल’ (Delhi Model) म्हणून पक्षाकडून त्याचा भारतभर प्रचार केला जात आहे. या मॉडेलची भूरळ जगालाही पडल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. त्यांनी सिंगापूर येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड सिटी’ संमेलनात आमंत्रित करण्यात आले आहे. पण मोदी सरकारकडून सव्वा महिने उलटूनही परवानगी मिळालेली नाही.

केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहित याबाबत खंत व्यक्त करत पुन्हा परवानगी मागितली आहे. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, सिंगापूर सरकारने दिल्ली मॉडेल सदार करण्यासाठी बोलावले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे संमेन होणार आहे. त्यामध्ये जगातील मोठे नेते सहभागी होणार आहे. त्यांच्यासमोर हे मॉडेल सादर केले जाईल. देशासाठी हा अभिमानास्पद क्षण असेल.

DM Arvind kejriwal Latest News & PM Narendra Modi Latest Marathi News
अखेर सामंत, देसाईंना आली जाग; 'सरकारनामा'च्या बातमीनंतर ट्विटरवर केला बदल

पण मला सिंगापूरला जाण्यासाठी अजूनही परवानगी मिळाली नाही, याचं दु:ख वाटते. मी सात जून रोजी म्हणजे जवळपास सव्वा महिन्यांपूर्वी परवानगी मागितली आहे. पण अजून त्याचे उत्तर आलेले नाही. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या व्यासपीठावर जाण्यापासून रोखणे योग्य नाही, अशी नाराजी केजरीवाल यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

देशामध्ये आपले राजकीय मतभेद असू शकतात. पण बाहेरील जगात आपण सर्वांनी हे मतभेद विसरून केवळ देशहित समोर ठेवायला हवे. तुम्ही गजुरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिला होता. तेव्हा संपूर्ण देशाने अमेरिकेवर टीका केली होती. तुमची साथ दिली होती, याची आठवणही केजरीवाल यांनी करून दिली आहे.

आता तुमचेच सरकार एखाद्या मुख्यमंत्र्यांला जागतिक व्यासपीठावर जाण्यापासून रोखत आहे. हे देशहिताच्या विरूध्द आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मला लवकरात लवकर सिंगापूरला जाण्याची परवानगी मिळावी, जेणेकरून मी वेळेत पोहचून देशाचे नाव मोठे करू शकेन, असं आवाहन केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in