Kapil Sibal : केजरीवालांसाठी सिब्बल मैदानात; भाजपवर गंभीर आरोप...

Arvind Kejriwal News : दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली आहे.
Arvind Kejriwal, Kapil Sibal
Arvind Kejriwal, Kapil SibalSarkarnama

Delhi Liquor Scam : दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने (CBI) दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सुद्धा समन्स पाठवले आहे. यामुळे ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सीबीआयने केजरीवाल यांना रविवारी चौकशीसाठी बोलावले आहे. यावरुन सिब्बल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सिब्बल यांनी भाजपवर (BJP) आरोप केला आहे की 'भाजप सरकार मुख्यमंत्री केजरीवाल यांना त्रास देत आहे.' या संदर्भात सिब्बल यांनी ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "सीबीआयने केजरीवाल यांना समन्स बजावले आणि भाजप म्हणतेय हा कायदा आहे... पण मी म्हणतो हा छळ आहे!" अशा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Arvind Kejriwal, Kapil Sibal
Karnataka Election 2023 : भाजपमधून गळती सुरुच ; येदियुरप्‍पांच्या नातवाचा JDS मध्ये प्रवेश ; बहीण भावावर नाराज...

सीबीआयने जारी केलेल्या नोटीसनुसार, केजरीवाल यांना रविवारी सकाळी 11 वाजता एजन्सीच्या मुख्यालयात साक्षीदार म्हणून तपास यंत्रणांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी केजरीवाल यांना 16 एप्रिलला हजर राहण्यासाठी समन्स बजावले.

दरम्यान, आम आदमी पार्टीने (AAP) याला षड्यंत्र म्हटले आहे. कथित दारू धोरण घोटाळ्याचे "मास्टरमाइंड" असल्याचा आरोप करत भाजपने केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. केजरीवाल यांना सीबीआयकडून समन्स मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर टीका केली आहे.

Arvind Kejriwal, Kapil Sibal
Nashik News : नाशिकमध्ये भुजबळांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तब्बल 11 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

या प्रकरणावर बोलताना आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, केजरीवाल यांनी अदानी प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांमुळेच सीबीआयने समन्स पाठवले. आमची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरूच राहणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. आम्ही कोणाला घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com