Delhi Politics: मनीष सिसोदियांची आठवण काढताच भर कार्यक्रमात केजरीवाल ढसढसा रडले...

Arvind Kejriwal on Manish Sisodia: मनीष सिसोदिया यांच्या आठवणीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भावूक
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एका कार्यक्रमात भाषण करताना 'आप'चे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

दिल्लीतील स्कूल ऑफ स्पेशलायज्ड एक्सलन्सचं उद्घाटन अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी बोलत असताना मनीष सिसोदिया यांची आठवण काढताच त्यांचा कंठ दाटून आला.

Arvind Kejriwal
AAP News : 'आप'च्या सिसोदिया, जैन यांनी या कारणांसाठी दिला राजीनामा

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी डोळ्यात आलेले अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्यांना त्यांच्या डोळ्यातले अश्रू रोखता आले नाहीत आणि ते भर कार्यक्रमात भावूक होत ढसढसा रडले. यानंतर त्यांनी पाणी पित आपलं भाषण काही वेळ थांबवत पुन्हा सुरू केलं. तसेच यावेळी त्यांनी मनीष सिसोदिया यांनी केलेल्या कामाबद्दल सांगितलं.

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, "आपण केलेली शिक्षणाची क्रांती थांबवावी, असं काहींना वाटतं. पण आम्ही तसं होऊ देणार नाहीत. मनीष सिसोदिया यांच्या सारख्या चांगल्या माणसाला भाजपनेने तुरुंगात टाकलं. पण ते लवकरच तुरुंगातून बाहेर येतील", असा विश्वास यावेळी केजरीवाल यांनी व्यक्त केला. दरम्यान, दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com