मुख्यमंत्र्यांनी एकाच फटक्यात पेट्रोल केलं 8 रूपयांनी स्वस्त

इतर राज्यांच्या तुलनेत कर कमी असल्याने पेट्रोल स्वस्त असतानाही मुख्यमंत्र्यांनी एकाच फटक्यात पेट्रोल आणखी 8 रुपयांनी स्वस्त केले आहे.
Petrol, Diesel Rates
Petrol, Diesel RatesSarkarnama

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल (Petrol), डिझेलवरील (Diesel) उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर भाजपशासित (BJP) राज्यांसह काँग्रेसच्या (Congress) राज्यांनी करात कपात केली होती. दिल्लीत (Delhi) इतर राज्यांच्या तुलनेत मूल्यवर्धित (VAT) कर कमी असल्याने पेट्रोल स्वस्त आहे. तरीही आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एकाच फटक्यात पेट्रोल आणखी 8 रुपयांनी स्वस्त केले आहे.

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली होती. यानंतर भाजपसोबतच काँग्रेसशासित राज्यांनीही करात कपात केली आहे. इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनीही करात कपात केली आहे.

आता आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या दिल्लीने पेट्रोलवरील व्हॅट 30 टक्क्यांवरून 19.40 टक्क्यांवर आणला आहे. यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झाले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोलवरील कर कमी आहे. यामुळे पेट्रोलही स्वस्त आहे. असे असतानाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी करात मोठी कपात करून दिल्लीकरांना दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून कर कमी होणार असून, पेट्रोलचे दरही स्वस्त होणार आहेत.

Petrol, Diesel Rates
ओमिक्रॉनवर कोव्हिशिल्ड लस प्रभावी ठरणार का? अदर पूनावालांनीच दिलं उत्तर

उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

Petrol, Diesel Rates
ठाकरेंच्या मर्जीतील कुंटे 'आऊट' अन् चक्रवर्ती राज्याचे बनले मुख्य सचिव

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com