मोठी बातमी : दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे हवेतच इंजिन बंद पडले अन् आगही लागली!

विमानाचे पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँन्डिंग...
SpiceJet flight in Patna Airport
SpiceJet flight in Patna AirportSarkarnama

पाटणा : पाटणा विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केलेल्या विमानाचे एक इंजिन बंद पडून आग लागल्याचा घटना घडली आहे. एका पक्षाच्या धडकेने इंजिन बंद पडल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे विमान पुन्हा पाटणाकडे वळवून आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली. सुमारे 185 प्रवासी असलेले हे विमान पाटणा विमानतळावरून सुरक्षितपणे उतरवण्यात आले. (Spice Jet flight Emergency Landing Latest News)

सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवले जाणार आहे. पाटणा विमानतळावरून उड्डाण करताच ही घटना घडली. विमानाला लागलेली आग पाहिल्यानंतर स्थानिकांनी जिल्हा प्रशासन आणि विमानतळ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. (Patna-Delhi Flight News)

SpiceJet flight in Patna Airport
हिंदुस्थान पेटणार..! भाजप नेत्याकडून राहुल गांधींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

विमानामध्ये 185 प्रवासी होते. तांत्रिक दोष आढळून आला असून याबाबत आता तपासणी केली जात असल्याची माहिती पाटणाचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी दिली. पाटणा विमानतळाच्या संचालकांनी सांगितले की, पाटणा ते दिल्ली विमानाच्या एका इंजिनाला आग लागली होती. त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सर्व 183 प्रवासी आणि दोन नवजात बालके सुरक्षित आहेत.

दरम्यान, डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, 'बर्ड हिट' म्हणजे पक्षाच्या धडकेमुळे ही घटना घडली आहे. हवेतच एक इंजिन बंद पडले होते.' दरम्यान, या घटनेमुळे विमानतळ अधिकाऱ्यांसह प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

विमानतळावर तातडीने सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com