MCD Elections : केजरीवालांच्या दणक्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा

MCD Elections : आदेश गुप्ता यांच्या मतदार संघातील उमेदवाराचाही पराभव झाला.
Aadesh Gupta)
Aadesh Gupta)sarkarnama

MCD Elections : दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने सपाटून मार झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता (Aadesh Gupta)यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (jp nadda) यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. नड्डा यांनी गुप्ता यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आदेश गुप्ता यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपचा सुपडा साफ केला. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या मतदार संघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. यात आदेश गुप्ता यांच्या मतदार संघातील उमेदवारांचाही पराभव झाला.

दिल्ली महापालिका निवडणुकीत २५o जागांपैकी आपने १३४ जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला १०४ जागा मिळाल्या आहेत. आदेश गुप्ता हे वार्ड नंबर १४१ (राजेंद्र नगर) येथे राहतात. येथून आम आदमी पक्षाच्या आरती चावला या निवडून आल्या आहेत.

प्रचाराच्या वेळी आदेश गुप्ता हे आपल्या विजयाचा दावा करीत होते. निवडणूक निकालानंतर गुप्ता यांचा दावा फोल ठरला. आम आदमी पक्षाच्या नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सत्येंद्र जैन यांच्या मतदार संघात झालेल्या आपच्या पराभवावर टीका केली आहे.

Aadesh Gupta)
Narendra Modi : शिंदेंच्या पाठीवर मोदींची कौतुकाची थाप ; म्हणाले,"टेकडीच्या गणपतीला माझं वंदन..

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, "महापौर आमचाच होणार" असे भाजपचे नेते सांगत आहेत. सर्वात जास्त मिळवल्यानंतरही आपला महापौरपद का मिळणार नाही, भाजपजचा दावा खरा ठरणार का, अशी विचारणा होत आहे.

यापूर्वी चंदीगडमध्येही आपला सर्वाधिक जागा मिळाल्या असताना भाजपाचा महापौर निवडून आला होता. त्यामुळे दिल्ली महापालिकेत महापौरपद निवडीची समीकरणं वेगळी असतात, हे समजून घेतलं पाहिजे.

आपच्या महापौरपदासाठीच्या दाव्याला अन्य पक्षाने विरोध केला तर निवडणुक घेतली जाईल. त्यानंतर अर्थातच जास्त नगरसेवक असलेल्या आपचा महापौर होईल, अशी शक्यता आहे. पण या नगरसेवकासोबत अन्य काही लोकप्रतिनिधीही या निवडणुकीत मतदान करतात, त्यामुळे महापौर निवडीची समीकरणं वेगळी असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com