सरसेनाध्यक्षांच्या मृत्यूनंतर संरक्षणमंत्र्यांची लोकसभेत मोठी घोषणा

राजनाथसिंह यांनी रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची तिन्ही सैन्य दलांकडून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
Bipin Rawat
Bipin RawatSarkarnama

नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडला असून, यामुळे अपघाताचे नेमके कारण समोर येण्यास मदत होणार आहे. याचबरोबर संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी अपघाताची तिन्ही सैन्य दलांकडून चौकशी करण्याची मोठी घोषणा लोकसभेत केली आहे.

आज लोकसभेत बोलताना राजनाथसिंह यांनी रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले. या चौकशीचे नेतृत्व हवाई दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चिफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह हे करणार आहेत. ते स्वत:ही हेलिकॉप्टर पायलट आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स आता सापडला आहे. ब्लॅकबॉक्ससाठी अपघात घडलेल्या ठिकाणापासून 300 मीटर ते 1 किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला आहे. हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडल्याने अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

जनरल बिपिन रावत हे काल (ता.8) तमिळनाडूच्या निलगिरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन या ठिकाणी तिथले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात होते. परंतु, तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यातील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाने दिली होती. रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदरसिंग, नायक गुरूसेवकसिंग, नायक जितेंद्रसिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे.

Bipin Rawat
राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण अखेर पोचला घरी
Bipin Rawat
माझ्या दहा पिढ्या बसून खातील एवढं कमावलय पण राजकारणात येऊन मी चूक केली!

दरम्यान, हा घातपात असावा अशी शक्यता निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, रावत हे आपल्या टीमसोबत हेलिकॉप्टरमध्ये असताना अपघात झाला. मेकॅनिकल फेल्युअर, हवामानात बदल होणे किंवा आकाशात उडणारा पक्षी समोर आला तरी अपघात होण्याची शक्यता असते. याव्यतिरीक्त पायलटची चूक होती का हे ही पाहणे गरजेचे आहे. मात्र सगळ्यात मोठी शक्यता घातपाताची वाटते. जर तसे असेल तर यामागे कोणता देश असेल त्यांना जशास तसे उत्तर द्यावेच लागेल. चीन सारख्या देशाने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे का हेही पहावे लागेल, असेही महाजन यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com