योगींच्या खांद्यावर हात ठेवून मोदी काय सांगत होते? अखेर 'त्या' फोटोचा उलगडा झाला...

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीच या फोटोचे रहस्य उलगडले आहे.
CM Yogi Adityanath, PM Narendra Modi
CM Yogi Adityanath, PM Narendra ModiSarkarnama

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदी योगींच्या खांत्यावर हात ठेवून त्यांना काहीतरी सांगत असल्याचे या फोटोत दिसत आहे. योगींनीच हे फोटो ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात त्याची चर्चा सुरू झाली. त्यावर अनेक मीम्सही आले. मोदी आणि योगींमध्ये नेमकी कुठली चर्चा झाली असावी, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

मोदी अन् योगींच्या या व्हायरल फोटोमागेच रहस्य अखेर उलगडले आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनीच या रहस्यमयी फोटोचा उलगडा केला आहे. लखनऊमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदी योगींना काय सांगत होते, हे उपस्थितांना सांगितले. याबाबतचे ट्विटही त्यांनी केले आहे.

CM Yogi Adityanath, PM Narendra Modi
राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा वाढल्या; उच्च न्यायालयानं दिला मोठा झटका

राजनाथसिंह म्हणतात, आताच एक फोटो ट्विट करण्यात आला होता. त्यामध्ये मोदींनी योगीजी यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो पाहून सर्व लोक विचारात पडले होते की, मोदीजी त्यांना काय सांगत असतील...', असं ट्विट करत राजनाथसिंह यांचा त्यांच्या भाषणाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

'पंतप्रधान मोदी योगींना म्हणत होते की, ते एका दिग्गज क्रिकेटपटूप्रमाणे फलंदाजी करत आहेत. त्यांनी अशी फलंदाजी सुरू ठेवत भाजपला विजय मिळवून द्यावा,' असं राजनाथसिंह व्हि़डीओमध्ये म्हणत आहेत. पंतप्रधान मोदी आणि योगींची 21 नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे भेट झाली होती. अखिल भारतीय डीजी परिषदेनिमित्त मोदी लखनऊच्या दौऱ्यावर होते.

पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी भाजपमध्ये पूर्ण शक्तीनिशी उतरण्याचे संकेत दिले आहेत. मागील काही दिवसांत पंतप्रधानांचे राज्याचे दौरे वाढले आहेत. त्यातच हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोतून भाजपला पंतप्रधान मोदी योगींच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून द्यायचे आहे, अशीही चर्चा आहे. त्यामुळे या फोटोला खूप महत्व असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com