भाजपला मोठा धक्का : यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव!

मौर्य यांच्या पराभवामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चाही रंगली आहे.
Keshav Prasad Maurya
Keshav Prasad MauryaSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने (bjp) पुन्हा सत्ता मिळवली असली तरी पक्षाची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा सराथू मतदारसंघातून तब्बल ६८४१ मतांनी पराभव झाला आहे. समाजवादी पार्टीच्या पल्लवी पटेल यांनी सराथूमधून विजय मिळवित मौर्य यांना पराभवाची धूळ चारली आहे. दरम्यान, मौर्य यांच्या पराभवामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चाही रंगली आहे. (Defeat of UP Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya)

सराथू मतदारसंघाची मतमोजणी एकूण ३३ फेऱ्यांमध्ये झाली. शेवटच्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना ९८७२७ मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी पल्लवी पटेल यांना १०५५६८ मते मिळाली आहेत. मौर्य यांचा पटेल यांनी तब्बल ६८४१ मतांनी पराभव केला आहे. दरम्यान, ३० व्या फेरीअखेर भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी थांबवत फेरमतमोजणीची मागणी केली होती.

Keshav Prasad Maurya
गोव्यात हे जिंकले आणि हे हरले!

दरम्यान, उपमुख्यमंत्री मौर्य हे सराथू मतदारसंघात ३१ व्या फेरीअखेर ते सुमारे ६९८१ मतांनी पिछाडीवर होती. त्यावेळी आणखी दोन फेरी होणे अद्याप बाकी होते. भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मतमोजणी थांबवत फेरमतमोजणीची मागणी केली होती. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केल्याने मतमोजणी केंद्रावर मोठा फौजफाटा तैनात करावा लागला होता. गोंधळ वाढल्यानंतर सपाच्या उमेदवार पल्लवी पटेल मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. दुसरीकडे, भाजपच्या पोलिंग एजंटांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

Keshav Prasad Maurya
गोव्याच्या निकालानं फडणवीसांना बळ अन् महाविकास आघाडीला भरली धडकी!

उपमुख्यमंत्री मौर्य हे पहिल्या फेरीपासून सराथू मतदारसंघातून पिछाडीवर होते. या मतदारसंघात मौर्य यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांनी जोरदार लढत दिली. मतमोजणीच्या ३१ व्या फेरीअखेर त्या सुमारे ७ हजार मतांनी आघाडीवर होत्या. एकीकडे राज्यात भाजपने पुन्हा सत्ता मिळविली असताना मौर्य यांचा झालेला पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Keshav Prasad Maurya
प्रमोद सावंतांच्या हॅट्‌ट्रीकपुढे अनेक अडथळे होते; पण... : भेगडेंनी उलगडले विजयाचे गणित!

सिराथू विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या ३१ फेऱ्यांमध्ये पल्लवी पटेल यांना १०५१२८ मते मिळाली होती, तर उमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना ९८१४७ मते मिळाली होती. सपाच्या पटेल त्या वेळी सुमारे सात हजार मतांनी आघाडीवर होत्या. शेवट्या दोन फेऱ्यांमध्ये मौर्य यांनी १४० मतांची आघाडी तोडली पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यांच्या पराभवामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चाही आज दुपारपासून सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com