दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची आज  चौकशी होणार - Deepika Sara and Shraddha Kapoor will be questioned today | Politics Marathi News - Sarkarnama

दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची आज  चौकशी होणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

एनसीबीने रकुल आणि दीपिकाची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश यांची काल चौकशी केली. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) करीत आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्या चौकशीत अनेक नावे समोर आली आहेत.

या प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावले होते. एनसीबीने रकुल आणि दीपिकाची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश यांची काल चौकशी केली. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही आज चौकशी होणार आहे.

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत.
 
अमली पदार्थांच्या देवाणघेवाण प्रकरणी सापडलेल्या चॅटशी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा संबंध असल्याचे आढळले आहे. तीच त्या व्हॉट्सअऍप ग्रुपची अॅडमिन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.  असून तिची उद्या (ता.२६) अमली पदार्थविरोधी पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) रडारवर बॉलिवूडमधील एक दिग्गज निर्माता- दिग्दर्शक आहे. त्याने २०१९ मध्ये दिलेल्या एका पार्टीत अमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचा आरोप आहे.

 एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. त्याआधी जया साहा हिची सलग तीन दिवस चौकशी झाली होती.

‘एनसीबी’ने या दिग्दर्शकाशी संबंधित एका व्यक्तीची काल चौकशी केली.  अभिनेत्री राकुल प्रीत आणि दीपिका पदुकोण हिची व्यवस्थापक करिश्‍मा प्रकाश यांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी राकुल प्रीतने अमली पदार्थप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असे सांगितले. मात्र, तिने रियाचे नाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. रिया तिच्या घरात अमली पदार्थ ठेवत असल्याची कबुली तिने दिली. आतापर्यंत सात सेलिब्रिटींना ‘एनसीबी’कडून समन्स पाठविण्यात आले आहे. तसेच आणखी जवळपास ३९ सेलिब्रिटी ‘एनसीबी’च्या रडारवर आहेत.

सुशांतसिंहने सेवन केलेले अमलीपदार्थ रियामार्फत पोचत असल्याचे ‘एनसीबी’च्या तपासातून निष्पन्न झाले आहे. तिला ते शौविक पुरवित होता. याप्रकरणी ‘एनसीबी’ने यापूर्वीच काही बड्या तस्करांना अटक केली आहे. रियाकडून सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्यामार्फत सुशांतला अमली पदार्थ पोहोचवले जात असल्याचे पुरावे ‘एनसीबी’च्या हाती लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह काल चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. काल  तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही काल चौकशी झाली आहे.  आज पुन्हा तिची चौकशी होणार आहे.  दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कालच्या चौकशीत दीपिका ही ड्रग्जशी निगडित व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन असल्याचे समोर आले आहे. सेलिब्रेटी मॅनेजर जया साहा ही या ग्रुपची प्रमुख आणि अॅडमिनही होती. या ग्रुपची करिष्मा ही सदस्या होती. या ग्रुपच्या माध्यमातून या अभिनेत्रींनी ड्रग्ज खरेदी आणि पुरवठा झाला आहे का हे एनसीबी तपासत आहे. याचबरोबर अभिनेत्रींनी ड्रग्ज घेतले का याचीही चौकशी सुरू आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख