BJP politics : भाजपचे माजी मंत्री काँग्रेसमध्ये ; मोदीचं टि्वट रिटि्वट करुन सांगितली 'मन की बात..', अश्रू अनावर

Deepak Joshi Mann ki Baat left BJP : केंद्रीय पातळीवरील नेत्यांवरही आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Deepak Joshi Mann ki Baat left BJP
Deepak Joshi Mann ki Baat left BJP Sarkarnama

Deepak Joshi Mann ki Baat left BJP : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीला सहा महिने बाकी आहेत. त्यापूर्वीच मध्यप्रदेशात राजकीय उलथापालथ होण्यास सुरवात झाली आहे. पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेले भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री दीपक जोशी यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीनं येथील राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. (deepak joshi mann ki baat left bjp in mp retweeted pm modi tweet before congress joining)

दीपक जोशींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टि्वट रिटिवट् करीत भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींनी बुद्ध पौणिमेला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या होत्या. भाजपमधील राज्याच्या नेत्यांवर दीपक जोशी यांची तक्रार होती, पण त्यांनी केंद्रीय पातळीवरील नेत्यांवरही आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताच जोशी यांच्या समर्थकांनी त्यांचे वडील कैलाश जोशी यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. 'कैलाश जोशी अमर रहे,' अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या भाजप प्रवेशाची आठवण झाली .शिंदे यांच्या प्रवेशाच्या वेळी 'माधवराव शिंदे अमर रहे,'अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

Deepak Joshi Mann ki Baat left BJP
Arvind Kejriwal : केजरीवाल अडचणीत ? ; सुकेश चंद्रशेखरचा मोठा गौप्यस्फोट ; तपास यंत्रणांना पुरावे देणार, उपराज्यपालांना पत्र..

मध्यप्रदेशातील राजकारणातील संत म्हणून कैलास जोशी यांची ओळख आहे. जनसंघापासून ते भाजपपर्यंत जोशी परिवार भाजपमध्ये सक्रिय होता. तीन वेळा भाजपच्या तिकीटावर दीपक जोशी आमदार, मंत्री झाले आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत त्यांना आलेले अनुभव कथन केले.

दीपक जोशी यांनी भाजप सोडल्यानंतर आपल्या समाज माध्यमांच्या अकाऊटवर काँग्रेसचा नव्हे तर आपल्या वडीलांचा फोटो लावला आहे. त्यांचा काँग्रेसच्या प्रवेशामुळे राज्यातील राजकारणात नवी समीकरण निर्माण होण्याची चित्र असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com