ठरलं! काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे विरुद्ध थरूर असा रंगणार सामना; तिसरा अर्ज...

Mallikarjun Kharge : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 8 ऑक्टोबर आहे.
Mallikarjun Kharge, Shashi Tharoor Latest News
Mallikarjun Kharge, Shashi Tharoor Latest NewsSarkarnama

Congress: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याच्यावरून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता याबाबतचा फायनल निर्णय होणार असून या अध्यक्ष निवडीच्या निवडणुकीत काँग्रेस हायकमांडचे विश्वासू मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) विरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे नेते शशी थरूर असा हा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत उतरलेले तिसरे उमेदवार झारखंडचे माजी मंत्री के. एन त्रिपाठी यांचा अर्ज रद्द झाला आहे. यामुळे शरूर आणि खर्गे यांच्यात थेट लढत बघायाला मिळणार आहे. (Mallikarjun Kharge, Shashi Tharoor Latest News)

Mallikarjun Kharge, Shashi Tharoor Latest News
मल्लिकार्जून खर्गे यांचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदाचा दिला राजीनामा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 8 ऑक्टोबर आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणुक प्रक्रिया होणार हे बघावं लागणार आहे. मात्र दोन्ही उमेदवार बघता ही निवडणूक होणार, असे बोलले जात आहे. याबाबत बोलतांना काँग्रेसचे निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली असून यामधील 20 अर्जापैकी 4 अर्जामधील स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आल्याने ते नाकारण्यात आले. यामुळे आता खर्गे आणि थरूर यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांनीही अर्ज मागे न घेतल्यास निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ही निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झारखंडमधील काँग्रेसचे नेते के.एन त्रिपाठी, शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाल्याने आता खर्गे आणि थरूर यांच्यात थेट लढत होणार आहे.

Mallikarjun Kharge, Shashi Tharoor Latest News
पाकिस्तानच्या विरोधात भारताकडून मोठा 'डिजीटल स्ट्राईक'

कृष्णानंद त्रिपाठी उर्फ ​​के.एन त्रिपाठी हे राजकारणात येण्यापूर्वी ते हवाई दलात होते. 2005 ला त्यांनी डाल्टनगंजमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये पुन्हा येथूनच निवडणूक लढवली आणि जिंकली होती. यानंतर ते झारखंडमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. यानंतर त्यांचा २०१४ मध्ये ते पुन्हा पराभूत आहेत. या निवडणुकीमुळे ते प्रकाशझोतात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com