Queen Elizabeth : महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन : राजेपदी थोरले चिरंजीव चार्ल्स

Queen Elizabeth : एलिझाबेथ या ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळणारी सम्राज्ञी होत्या.त्‍या सत्तर वर्षे ब्रिटनच्‍या सम्राज्ञी होत्‍या.
Britain's Queen Elizabeth passes away
Britain's Queen Elizabeth passes awaysarkarnama

नवी दिल्ली : इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन (Britain's Queen Elizabeth passes away) झाले . वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सांयकाळी बालमोरल (Balmoral ) येथे राणीचे निधन झाले. त्यानंतर इंग्लंडच्या परंपरेनुसार राजगाधीची सूत्रे चार्ल्स (Charles succeeds as England's King) यांच्याकडे आली आहेत. (Britain's Queen Elizabeth passes away)

बकिंगहॅम पॅलेसने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची घोषणा केली आहे. एलिझाबेथ या ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळणारी सम्राज्ञी होत्या.त्‍या सत्तर वर्षे ब्रिटनच्‍या सम्राज्ञी होत्‍या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणींच्या निधनाबाबत टि्वट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

राजघराण्यावर शोककळा पसरली आहे. सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. शाही राजवाडे आणि घरांवर युनियन जॅक अर्ध्या मास्टवर फडकवला गेला आहे. याशिवाय ब्रिटनच्या सर्व बाह्य चौक्या आणि लष्करी तळांवरही अर्ध्‍यावर ध्वज फडकवण्यात आला आहे.

Britain's Queen Elizabeth passes away
Ashish Shelar : पेंग्विन सेनेची पिलावळ काय करत होती ? शेलारांचा ठाकरेंना सवाल

राणीला चार मुले आहेत. प्रिन्स चार्ल्स, राजकुमारी ऍनी, अँड्र्यू आणि एडवर्ड, ज्यांच्यापासून त्‍यांना आठ नातवंडे आणि 12 पणतू आहेत. आता प्रिन्स विल्यम वयाच्या 40 व्या वर्षी ब्रिटीश सिंहासनाचे वारसदार बनले आहेत. त्याचे वडील प्रिन्स चार्ल्स आता राजा बनले आहेत.

इंग्लंडच्या परंपरेनुसार राजगाधीची सूत्रे चार्ल्स यांच्याकडे आली आहेत. ब्रिटीश साम्राज्याच्या शतकानुशतके परंपरेने चालत आलेल्या संकेतांनुसार जेव्हा राणी किंवा इंग्लंडच्या प्रमुखाचे काही कारणाने निधन होते तेव्हा, संबंधित व्यक्तीचा थोरला मुलगा/मुलगी राज्याचा प्रमुख बनतो. इंग्लंडच्या राजघराण्याच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत विस्ताराने माहिती मिळते.73 वर्षे वयाचे चार्ल्स यांना किंग चार्ल्स तिसरा किंवा इतर कोणत्या नावाने संबोधायचे याबाबत अद्याप निर्णय झाला नाही.

गुरुवारी दुपारी त्यांच्या प्रकृती अस्‍वथ असल्‍याची बातमी आली होती. 19 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्‍या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्‍या. राजघराण्याने सांगितले होते की, राणी episodic mobility या आजाराने ग्रस्‍त होत्‍या. या आजारात रुग्णाला उभे राहण्यास व चालण्यास त्रास होतो. आजारपणामुळे राणी बालमोरल पॅलेसमध्ये राहत होती. या राजवाड्यातून त्‍या सर्व कार्यालयीन कामे करत होत्‍या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in