CU MMS case : मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण: पंजाब सरकार अॅक्शन मोडमध्ये

CU MMS case| मोहालीचे एसएसपी विवेक सोनी यांंनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे
Mohali SSP Vivek Soni
Mohali SSP Vivek Soni

चंदीगड : चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवला. हे प्रकरण समोर आल्यानंतर काही मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी आता पंजाब पोलीस आणि पंजाब सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. ( Chandigarh University crime news)

मोहालीचे एसएसपी विवेक सोनी यांंनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला असून विद्यार्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणी आम्ही विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात घेतलं असून यात बरेच पुरावे आहेत. जे आम्हाला गोळा करायचे आहे. याशिवाय ही तरुणी शिमल्यात कोणाला व्हिडिओ पाठवत होती तेही समोर आले आहे. आम्ही त्या प्रकरणाचाही तपास करत आहोत आणि व्हिडिओमध्ये काय पाठवले जात होते हे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Mohali SSP Vivek Soni
Chandigarh Crime|वसतीगृहात विद्यार्थींनीचे आक्षेपार्ह व्हिडीओ; 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

याशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. ''चंदिगड विद्यापीठात एका मुलीने अनेक विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केले आहे. हे अतिशय गंभीर आणि लज्जास्पद आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल. पीडित मुलींमध्ये हिंमत आहे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. सर्वांनी संयम बाळगा, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

तसेच,पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी कऱण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोपी विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान काही मुलींची प्रकृती खालावली होती, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यामागे कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व घडले, याचा तपास सुरू असल्याचं गुलाटी यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com