खूषखबर! आता कोरोना लस घेणे होणार सोपे...को-विन पोर्टल तुमच्याच भाषेत!

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला आहे.
CoWIN portal in Hindi other 14 languages from next week
CoWIN portal in Hindi other 14 languages from next week

नवी दिल्ली : देशात कोरोना (covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, केंद्र सरकारने लसीकरणावर (covid vaccination) भर दिला आहे. लसीकरणासाठी नोंदणी करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन सरकारने आता हिंदीसह 14 प्रादेशिक भाषांमध्ये को-विन (CoWIN) पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून ही सुविधा सुरू होईल. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाविषयक उच्चस्तरीय मंत्रिगटाची बैठक आज झाली. ही बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागरिकांना लशीसाठी नोंदणी करताना भाषेचा अडसर येऊ नये यासाठी आता को-विन पोर्टल हिंदीसह 14 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापासून ही सुविधा सुरू होणार आहे. 

केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लसीकरण खुले केले आहे. लस घेण्यासाठी नागरिकांनी को-विन पोर्टलवर नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. को-विन पोर्टलवर नोंदणी करताना केवळ आधारच नव्हे तर इतरही कागदपत्रांचा वापर करता येतो. तुम्ही लशीसाठी नावनोंदणी www.cowin.gov.in या पोर्टलवर करु शकता. 

नावनोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे 
1) आधार 
2) वाहन चालवण्याचा परवाना 
3) पासपोर्ट 
4) पेन्शन पासबुक 
5) एनपीआर स्मार्ट कार्ड 
6) मतदार ओळखपत्र 

वरीलपैकी एका कागदपत्राच्या आधारे नोंदणी करुन तुम्हाला लस घेता येईल. सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com