लहान मुलांसाठी महत्वाची बातमी; 12 ते 14 वयोगटातील मुलांचे बुधवारपासून लसीकरण

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर आला असल्याने मोठा दिलासा मिळत आहेत.
Covid 19 vaccine
Covid 19 vaccine Sarkarnama

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid) रुग्णांचा आकडा दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर आला असल्याने मोठा दिलासा मिळत आहेत. त्यातच केंद्र सरकारने आणखी एक खुषखबर दिली आहे. येत्या बुधवारपासून (ता. 16) देशातील 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोरोना लसीकरण (Covid Vaccination) सुरू केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया (Mansukh Mandviya) यांनी केली. तसेच 60 वर्षांपुढील सर्व नागरिकांनाही लशीचा तिसरा डोस घेता येणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2008, 2009 आणि 2010 या वर्षांत म्हणजेच जी मुलं 12 वर्षांपुढील आहेत, ते 16 मार्चपासून लस घेण्यास पात्र ठरणार आहेत. सध्या 14 वर्षांपुढील मुलांना कोरोना लस दिली जात आहे. आता 12 वर्षांपुढील सर्वजणांना लस खुली होणार आहे. तसेच सध्या 60 वर्षांपुढील इतर आजार असलेल्या नागरिकांना तिसरा डोस दिला जात आहे. आता सर्वांनाच ही लस घेता येणार आहे.

Covid 19 vaccine
काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; माजी प्रदेशाध्यक्षांनी माजी मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

आरोग्य मंत्री मांडवीया यांनी याबाबत ट्विटरवर घोषणा करताना म्हटलं आहे की, मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित. मला सांगायला आनंद होतोय की, 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांना कोरोना लसीकरण सुरू होत आहे. त्याचबरोबर 60 वर्षांपुढील सर्व नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता येईल. मुलांचे पालक आणि 60 वर्षांपुढील नागरिकांनी लस घ्यावी, असं आवाहनही मांडवीया यांनी केलं आहे.

मुलांना कोणती लस दिली जाणार?

आरोग्य मंत्रालयानुसार, 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोरबेव्हॅक्स (Corbevax) ही लस दिली जाणार आहे. ही लस हैदराबाद येथील बायोलॉजिकल-ई या कंपनीने तयार केली आहे. या लशीला 21 फेब्रुवारी रोजी आप्तकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लस 14 ते 18 वयोगटातील मुलांनाही घेता येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com