तुम्ही कोव्हॅक्सिन घेतलीय? 'एम्स'च्या अभ्यासातून समोर आली धक्कादायक बाब

कोव्हॅक्सिन या कोरोना लशीबाबत धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
तुम्ही कोव्हॅक्सिन घेतलीय? 'एम्स'च्या अभ्यासातून समोर आली धक्कादायक बाब
covaxin sarkarnama

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लशीवर नुकतेच शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, आता या लशीबाबत धक्कादायक माहिती 'एम्स'च्या अभ्यासातून समोर आली आहे. कोरोना विरोधात ही लस 50 टक्केच प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे ही लस घेतलेल्या नागरिकांना कोरोनापासून कितपत संरक्षण मिळते, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) हा अभ्यास केला आहे. कोव्हॅक्सिन दिलेल्या तब्बल 2 हजार 714 आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली होती. लस घेतल्यानंतर कोरोना लक्षणे दिसून येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. त्यांची 15 एप्रिल ते 15 मे या कालावधीत आरटी-पीसीआर चाचणी करम्यात आली होती. या अभ्यास 'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे. जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना एम्सकडून कोव्हॅक्सिन देण्यात आली होती.

एम्सच्या अभ्यासानुसार, कोव्हॅक्सिन लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर दोन आठवडे अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीनंतर लशीचा प्रभावीपणा 77.8 टक्क्यांपेक्षा कमी आढळून आला आहे. याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची शक्यता जास्त असल्याने त्यांच्यात लशीची परिणामकारकता कमी दिसून आली असावी. परंतु, लशीचा प्रभावीपणा कमी झाल्यामुळे कोरोनापासून मिळणाऱ्या संरक्षणाबाबतही शंका उपस्थित होत आहे.

covaxin
जुनी वाहने भंगारात काढणाऱ्या वाहनमालकांसाठी गडकरींची मोठी घोषणा

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे ही लस घेतलेल्या नागरिकांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. तसेच कोव्हॅक्सिन लशीचा इतर अनेक देशांमध्ये वापराचा मार्गही मोकळा झाला आहे. संघटनेने 18 वर्षांपुढील नागरिकांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस असल्याने भारतासाठी ही महत्वाची घडामोड मानली जात होती.

covaxin
संजय पांडेंचा पत्ता कट! महासंचालकपदासाठी तीन पोलीस अधिकारी शर्यतीत

कोव्हॅक्सिनचा समावेश इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये (ईयूएल) करावा, यासाठी भारत बायोटेकने काही महिन्यांपूर्वी डब्लूएचओकडे अर्ज केला होता. जुलै अथवा सप्टेंबर महिन्यात लशीला मान्यता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. जगभरातील अनेक देशांमध्ये कोव्हॅक्सिनला मान्यता मिळणे प्रलंबित आहे. यात अमेरिका, ब्राझील, हंगेरी आदी देशांचा समावेश आहे. आतापर्यंत 13 देशांमध्ये या लशीला मान्यता मिळाली आहे. आणखी देश मान्यता देण्याच्या मार्गावर आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in