येडीयुरप्पांना दणका : जुन्या प्रकरणाने खाल्ली उचलं; खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश

B. S. Yediyurappa | BJP | Karnataka : भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात चालणार खटला
karnataka ex cm b s yediyurappa
karnataka ex cm b s yediyurappaSarkarnama

बंगळूरु : खाण घोटाळ्याच्या आरोपांनंतर कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा (B. S. Yediyurappa) आता नव्या अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत. कर्नाटकच्या एका विशेष न्यायालयाने येडीयुरप्पा यांच्याविरोधात एका जुन्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्र्यांविरधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे न्यायालयाने आपल्या आदेश म्हटले आहे. २००६ मधील ४३४ एकर जमीन डिनोटिफाय करण्यासंबंधीचे हे प्रकरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २००६ मध्ये भाजपा-जनता दल (धर्मनिरपेक्ष) सरकारमध्ये येडियुरप्पा उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी राज्य सरकारने बंगळुरूमध्ये आयटी पार्क स्थापन करण्याच्या उद्देशाने ४३४ एकर जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र संबंधित जमीन बेकायदेशीरपणे डिनोटिफाय करण्यात आली आणि खासगी व्यक्तींकडे हस्तांतरित करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या जमिनीचे खरे मालक आणि राज्य सरकारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.

वासुदेव रेड्डी यांनी या प्रकरणी २०१३ मध्ये लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी २०१५ मध्ये याचा तपास सुरू केला होता. मात्र हा तपास थांबवावा आणि संबंधित खटला रद्द करण्यात यावा अशी मागणी करत येडियुरप्पा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. यासाठी त्यांनी या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि माजी उद्योगमंत्री आर.व्ही. देशपांडे यांच्याविरोधातील खटला उच्च न्यायालयाने रद्द केला असल्याचा संदर्भ दिला. पण उच्च न्यायालयाने त्यास नकार दिला.

परिणामी लोकायुक्त पोलिसांनी या प्रकणाचा तपास सुरु ठेवून जानेवारी २०२१ मध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला. यात येडियुरप्पा यांना जमीन नोटिफाय करण्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा अन्य लाभ मिळालेला नाही. त्यामुळे हा खटला पुढे चालवण्यासाठी पुरेसे पुरावेही उपलब्ध नसून तो बंद करावा, असे म्हटले होते. दरम्यान, या क्लोजर रिपोर्टला लोकनिर्वाचित लोकप्रतिनिधींविरोधात गुन्हेगारी प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या न्यायालयात वासुदेव रेड्डी यांनी आव्हान दिले.

त्यानंतर या विशेष न्यायालयाने जुलै २०२१ मध्ये पोलिसांचा तपासणी अहवाल फेटाळून लावत योग्य तपास केला नसल्याचे ताशेरेओढले. दरम्यान आता या प्रकरणात आरोपी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे निरीक्षण नोंदवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश जयंत कुमार यांनी दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com