अहमद पटेल प्रकरणाचा दाखला देत भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव!

भाजपच्या तक्रारीनंतर महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी रोखली
अहमद पटेल प्रकरणाचा दाखला देत भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव!
BJP Leader's DelegationSarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha election) आज (ता. १० जून) झालेल्या मतदानात महाराष्ट्र (Maharashtra) व हरियाणात (Haryana) महाविकास आघाडी व कॉंग्रेसच्या पाच मतदारांनी निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन केल्याने त्यांची मते रद्द करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी भाजपच्या (BJP) उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आज संध्याकाळी केली. आयोगाने त्याची दखल घेतली, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची परवानगी दिल्लीतून रोखली व मतमोजणी सुरू होण्यास विलंब झाला. गुजरातमध्ये २०१७ मध्ये याच मुद्यावरून दिवंगत कॉंग्रेस नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या मतमोजणीची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत लांबली होती. (Counting of votes in Maharashtra Rajya Sabha elections stopped after BJP's complaint)

BJP Leader's Delegation
राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीस परवानगी नाही

महाविकास आघाडीची तीन मते अवैध असल्याने ती बाद ठरवावीत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयागोकडे केली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवरच भाजपने जोरदार आक्षेप घेतला. याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल व पक्षनेते ओम पाठक यांचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी आयोगाच्या कार्यालयात पोचले व त्यांनी वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत, महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस), यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) आणि सुहास कांदे (शिवसेना) यांनी आपल्या मतपत्रिका आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींच्या व्यतिरिक्त इतरांना जाहीरपणे दाखविल्या, त्यामुळे त्यांची मते संपूर्ण बाद करावीत अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली होती.

BJP Leader's Delegation
शिवसेनेच्या संजय पवारांना काँग्रेस-राष्ट्रवादीने दिली पहिल्या पसंतीची १४ मते!

हरियाणातदेखील कॉंग्रेसचे बी. बी. बात्रा व श्रीमती किरण चौधरी यांनी मतदानाआधी आपल्या मतपत्रिका इतरांना दाखविल्या होत्या. दोन्ही राज्यांतील हे प्रकार निवडणूक प्रक्रियेचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा आक्षेप भाजप शिष्टमंडळाने घेतला होता. निवडणूक आयोगानेच २०१७ मध्ये कॉंग्रेसचे गुजरातेतील राज्यसभा उमेदवार अहमद पटेल यांच्या निवडणुकीत जो निकाल दिला, त्याच्याशी या पाचही मतदारांचे अशा प्रकारचे वर्तन सरळसरळ विरूध्द तर आहे.

BJP Leader's Delegation
लक्ष्मण जगतापांनी फडणवीसांना 'सीएम साहेब' म्हणून हाक मारली!

लोकप्रतिनिधी कायद्यातील राज्यसभा निवडणूक, मतदान व मतमोजणी याबाबत १९६१ मधील निकालाचेही ते सरळसरळ उल्लंघन ठरते, असा आक्षेप भाजपने घेतला आहे. पक्षाने आपल्या दाव्याच्या पुष्ट्यार्थ कागदपत्रेही सादर केली आहेत. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगातील हालचाली गतिमान झाल्या व निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरू करू नका, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिल्लीतून देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in