मोदींच्या आईची नक्कल करणं ‘आप’ला महागात पडणार?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच गुजरातमध्ये भाजप विरुद्ध आपचा संघर्ष पेटलेला दिसून येत आहे. कारण आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मोदींच्या आईबद्दल भाष्य करणारा हा व्हिडीओ गुजरातसह देशभरातील भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मात्र या व्हिडीओ संदर्भात तारीख नमूद करण्यात आलेले नाही. व्हिडीओ जुना असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह अनेक भाजप नेत्यांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला करत, अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

Narendra Modi
Himachal Pradesh Election : निवडणुका जाहीर, एकाच टप्प्यात होणार मतदान!

आप नेत्यानं फक्त देशाच्या प्रधानसेवकाच्या आईचाच नव्हे तर एका १०० वर्षीय गुजराती महिलेचा देखील अपमान केला आणि त्याला गुजरातची जनता येत्या निवडणुकीत उत्तर देईल, अशा शब्दात स्मृती इराणींनी केजरीवालांना सुनावलंय.

दरम्यान, मोदींच्या आईबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आप नेते गोपाल इटालिया हे राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी काही वेळासाठी त्यांना ताब्यात घेतलं होते.

Narendra Modi
MCAच्या निवडणुकीत ट्विस्ट : फडणवीसांच्या निकटवर्तीयास पवारांचे पाठबळ; शेलारांची शिष्टाई यशस्वी!

या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने इटालिया यांना समन्स पाठवला आहे. तर दिल्ली पोलिसांनी बुधवारी इटालिया यांना यासंदर्भात काही वेळासाठी ताब्यातही घेतलं होते.आपण पाटीदार असल्यानंच भाजपकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप, आप नेते गोपाल इटालिया यांनी केलाय.

याआधीही भाजपनं इटालियांचे दोन व्हिडीओ रिलीज केले होते. यातील एका व्हिडीओत इटालिया मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान करत होते. तर दुसऱ्या व्हिडीओत धार्मिक स्थळंही महिलांच्या शोषणाचे अड्डे असल्याचं सांगत ते महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखताना दिसत असल्याचं दाखवण्यात आलंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com