विरोधकांचे महिलेशी गैरवर्तन अन् सहा पोलिस तडकाफडकी निलंबित

महिलेच्या साडीला धरून ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
UP Cops Suspended After SP Workers Sari Yanked By Rivals
UP Cops Suspended After SP Workers Sari Yanked By Rivals

लखनऊ : उत्तर प्रदेशात पंचायत समिती (ब्लॅाक प्रमुख) सभापतीसाठीच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. सुमारे 825 समितींसाठी ही निवडणूक होणार आहे. पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गुरूवारी विरोधकांनी एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. महिलेच्या साडीला धरून ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सहा पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. (UP Cops Suspended After SP Workers Sari Yanked By Rivals)

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही करण्यासाठी निघालेल्या महिला सदस्यासोबत हा प्रकार घडला आहे. समाजवादी पक्षाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलेची साडी ओढल्याचा आरोप केला आहे.  भाजप कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल ट्विट केला आहे. 

लखीमपुर खीरी जिल्ह्यातील पसगवां ब्लॅाकमध्ये समाजवादी पक्षाकडून रितू सिंह या उमेदवारी अर्ज भरणार होत्या. त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही करणाऱ्या एक सदस्य कार्यालयात निघाली होती. पण विरोधी कार्यकर्त्यांनी त्यांची अडवणूक केली. हे कार्यकर्ते त्यांची साडी ओढत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अखेर या महिलेला अर्ज भरताच आला नाही. आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी ही अडवणूक करण्यात आल्याचा दावा समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. 

या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत परिसरात नियुक्तीला असलेल्या सहा पोलिसांचे निलंबन केलं आहे. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह दोन निरीक्षक व तीन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. महिलेला अडवणारे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार रेखा वर्मा यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. ही घटना समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी व सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यादव यांनी हा व्हिडीओही ट्विट करत निवडणूक जिंकण्यासाठी महिलेचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचेही समोर आलं आहे. प्रियांका गांधी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. पीएम साहेब आणि सीएम साहेब यासाठीही शुभेच्छा द्या, आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गोळाबार, दगडफेक केली. अनेक पत्रकारांना मारहाण केली. अनेक ठिकाणी महिलांशी गैरवर्तन केलं. कायदा-सुव्यवस्थेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू आहे, अशी टीका गांधी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर, सिध्दार्थ नगर, पीलीभीत, उन्नाव, सीतापूर, लखीमपूर, रायबरेली, एटा, अलीगढ, बदायूं, बुलंदशहर, बिजनौर आदी जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी दगडफेक, गोळीबाराच्या घटना घडल्या आहे. उमेदवारांना मारहाण झाल्याचेही समोर आलं आहे. समाजवादी पक्षाने याबाबत भाजपला जबाबदार धरले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com