भाजप याचा फायदा घेणार! माजी मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्षांचं संभाषण व्हायरल

माईक सुरू असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील कुजबूज सगळ्यांच्या कानावर पडली आहे.
भाजप याचा फायदा घेणार! माजी मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्षांचं संभाषण व्हायरल
Congress Sarkaranama

बंगळूर : कर्नाटक काँग्रेसचे (Karnataka Congress) प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांच्याविषयी दोन नेते करीत असलेली चर्चा मागील महिन्यात जगजाहीर झाली होती. माईक सुरू असताना दोन नेत्यांमधील कुजबूज सगळ्यांच्या कानावर पडली होती. यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. आता पुन्हा याचीच पुनरावृत्ती झाली आहे. या वेळी खुद्द शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaih) यांच्याबाबत हा प्रकार झाला आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीवेळी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातील संवादाचा व्हिडीओ बाहेर आला आहे. या कार्यक्रमात देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र नव्हते. कारण त्याच दिवशी सरदार पटेलांची जयंती असते. याची नोंद घेऊन सिद्धरामय्यांनी ते हळूच शिवकुमार यांच्या कानावर घातले. यानंतर शिवकुमार यांनी पटेलांचे छायाचित्र तातडीने लावण्यास सांगितले. भाजप याचा फायदा घेईल, असेही सिद्धरामय्या हे शिवकुमार यांना सांगताना ऐकू येत आहे. अखेर या संभाषणानंतर पटेल यांचा फोटो कार्यक्रमात लावण्यात आला.

भाजपचे आमदार व माजी मंत्री एम.पी.रेणुकाचार्य यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हे अतिशय लज्जास्पद आहे. एका इटालियन व्यक्तीचे गुलाम एवढे घाबरत आहेत. नेहरू परिवाराचा पटेलांना विरोध होता याबद्दल कुणाला शंका असल्यास हा व्हिडीओ याचे उत्तर आहे.

Congress
चांदीवाल समितीसमोर परमबीरसिंहांचा मोठा खुलासा

दरम्यान, मागील महिन्यात काँग्रेसमधील दोन नेत्यांमधील संभाषण असेच व्हायरल झाले होते. शिवकुमार यांच्यावर 10 ते 12 टक्के लाच घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ते मद्यप्राशन करून कार्यालयात येत असल्याचा उल्लेख त्या संभाषणात करण्यात आला होता. माजी खासदार व्ही. एस. उगरप्पा आणि प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक सलीम अहमद यांच्यामधील संवादाचा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

Congress
तुम्ही कोव्हॅक्सिन घेतलीय? 'एम्स'च्या अभ्यासातून समोर आली धक्कादायक बाब

दोघांमधील संभाषणाची तातडीने दखल घेण्यात आली आहे. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अहमद यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर उगरप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होता. दरम्यान, या प्रकरणाविषयी बोलताना शिवकुमार यांनी संभाषणातील आरोप फेटाळून लावले होते. माझा आणि पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही. पत्रकार परिषदेपूर्वी हे संभाषण झालेले आहे. ते कॅमेरात कैद झाले. पक्षामध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in