Telangana Politics : राज्यपालांशी वाद विकोपाला; मुख्यमंत्री ध्वजारोहणालादेखील आले नाहीत

केंद्र सरकार आणि तेलंगण उच्च न्यायालयाने प्रजासत्ताक दिवस सार्वजनिकरित्या मोठा करण्याचे आदेश दिले होते.
Telangana Politics :
Telangana Politics :

Telangana Politics : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वादाप्रमाणे तेलंगण राज्यातही राज्य सरकार आणि राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. हा संघर्ष इतका टोकाला गेला आहे की, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाला उपस्थित राहिले नाहीत. यावरून आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Telangana Politics :
Sujay Vikhe News : पदवीधरमध्ये एका रात्रीत चित्र बदलण्याची भाजपची क्षमता; विखेंचा इशारा कुणाला ?

केंद्र सरकार आणि तेलंगण उच्च न्यायालयाने प्रजासत्ताक दिवस सार्वजनिकरित्या मोठा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तेलंगण सरकारने कोरोना संसर्गाचं कारण देत कार्यक्रम राजभवनातच करण्याचे निर्देश दिले. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अशाच प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. राज्य सरकारने ध्वजारोहणाचं आयोजन राजभवनात केल्याने राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन यांनी राज्यपाल भवनातच ध्वजारोहन केले मात्र, मुख्यमंत्री प्रोटोकॉलनुसार प्रजासत्ताक दिनाच्या कामाला उपस्थित राहिले नाही. ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले

या सर्व प्रकरणावर आता राज्यपाल सौंदराराजन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ''मुख्यमंत्र्यांनी संविधानाचा आदर केला नाही. हे तेलंगणच्या इतिहासात लिहिले जाईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला नाही. मी राजभवनातच ध्वजारोहण करावे, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती.'' असं सौंंदरराजन यांनी म्हटलं आहे.

वादाचे कारण काय?

राज्यपाल सुंदरराजन हे भाजपचे आहेत. त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षा राहिल्या आहेत. केसीआर हे भाजपविरोधी गटातील आहेत. मोदी सरकारच्या धोरणांना ते सातत्याने विरोध करत आहेत. याशिवाय राज्यपालांनी त्यांची अनेक विधेयके रखडवून ठेवल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे. त्या सरकारच्या कामात ढवळाढवळ करतात. असा के सी आरचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com