Mallikarjun Kharge News : मल्लिकार्जून खर्गेंच्या कुटुंबीयांची हत्या करण्याचा कट : काँग्रेसकडून भाजप नेत्याचा ऑडिओ प्रसिद्ध

सुरजेवाला यांनी गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांचे एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध केले आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesarkarnama

बंगळूर : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भाजपच्या उमेदवाराने ‘पुसून टाकण्यासाठी’ हत्येचा कट रचला असल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शनिवारी केला. (Conspiracy to kill Mallikarjun Kharge's family : Congress releases audio of BJP leader)

सुरजेवाला यांनी गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघातील भाजपचे (BJP) उमेदवार मणिकांत राठोड यांचे एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये ते कन्नडमध्ये "खर्गे, त्यांची पत्नी आणि मुलांचा नाश करतील’ असे कथितपणे बोलताना ऐकायला मिळते.

Mallikarjun Kharge
Sharad Pawar On Ajitdada :अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकले.....

मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा कथित ऑडिओ लीक झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्तापूरचे भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांचा रवी नावाच्या कार्यकर्त्याशी बोलल्याचा ऑडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेसने (Congress) एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे ज्यामध्ये मणिकांत राठोड यांनी रवीसोबत संवाद साधला होता.

काँग्रेसचा मोदींवर निशाणा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी काँग्रेसने खर्गे यांच्या कुटुंबीयांच्या हत्येची सुपारी म्हणून गुंडाला भाजपचे तिकीट दिले, असा आरोप केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा भाजपचा डाव मणिकांत राठोड यांच्या तोंडून बाहेर आला आहे. नरेंद्र मोदींनी खर्गे कुटुंबाला मारण्यासाठी जी सुपारी दिली होती, त्यासाठी त्या गुंडाला तिकीट दिले का? असा सवाल काँग्रेसने ट्विटद्वारे केला आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्याचे एकमेव कारण हा मोदींचा परिद्वेष आहे का? असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

Mallikarjun Kharge
Sharad Pawar : सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारवर परिणाम होणार नाही : पवारांचे महत्वपूर्ण विधान

ऑडिओच्या सत्यतेबाबत चौकशी करणार : बोम्मई

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, भाजप उमेदवाराचा ऑडिओ व्हायरल झाला असून, वस्तुस्थितीची चौकशी केली जाईल. या ध्वनीफितीचे भांडवल करून काँग्रेस भाजपविरोधात भडकावत आहे. या संदर्भात हुबळी येथे प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, ऑडिओमध्ये छेडछाड झाली आहे की नाही, हे तपासले पाहिजे. त्यांनी सांगितले की, ऑडिओबद्दल गुन्हा नोंदवून सत्यतेची चौकशी करू.

Mallikarjun Kharge
Basavaraj Bommai News : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना; आम्ही त्यांचा बंदोबस्त करू’

काँग्रेस नेते खोटे बोलत आहेत : राठोड

बनावट ऑडिओ तयार करून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. काँग्रेस नेते जे काही बोलत आहेत ते खोटे आहे, असे भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड शनिवारी म्हणाले. पत्रकारांशी बोलताना मणिकांत राठोड यांनी काँग्रेस नेत्यांचे आरोप फेटाळून लावले. काँग्रेसचे नेते माझ्याविरोधात जे बोलत आहेत ते खोटे आहे. बनावट ऑडिओ तयार केला. पराभवाच्या भीतीने बिनबुडाचे आरोप करत असल्याचे ते म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com