Karnataka Assembly Speaker : कर्नाटकात प्रथमच मुस्लीम नेता विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार; यू. टी. खादर फरीद यांचा अर्ज दाखल

गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Karnataka Assembly Speaker Election
Karnataka Assembly Speaker ElectionSarkarnama

Karnataka News : कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ काँग्रेस श्रेष्ठींनी अखेर माजी मंत्री आणि पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ आमदार यू. टी. खादर फरीद यांच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Congress's U. T. Khadar's application filed for the post of Karnataka Assembly Speaker)

मंगळूरचे आमदार यू. टी. खादर फरीद यांनी मंगळवारी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Assembly Speaker) काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याची शक्यता असून त्याची उद्या (ता. २४ मे) अधिकृत घोषणा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Karnataka Assembly Speaker Election
Cabinet Decision : पंढरपूर, अक्कलकोटसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता; पंढरपूरला तातडीने १० कोटी

आमदार यू. टी. खादर फरीद यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री बी. झेड्. जमीर अहमद खान आणि इतर काँग्रेस (Congress) नेत्यांच्या उपस्थितीत विधानसभा सचिवांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्ताधारी पक्षाचा नामनिर्देशित उमेदवार सर्वसाधारणपणे एकमताने अध्यक्ष म्हणून निवडला जातो. राज्यात विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिले मुस्लिम नेते असतील.

Karnataka Assembly Speaker Election
Manchar Bazar Samiti : देवदत्त निकमांच्या बंडखोरीमुळे गाजलेल्या मंचर बाजार समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे भालेराव

खादर फरीद हे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात विरोधी पक्षाचे उपनेते होते. त्यांनी पहिल्यांदा २००७ मध्ये तत्कालीन उल्लाळ मतदारसंघातून (आता मंगळूर) पोटनिवडणूक लढवली होती. त्यांचे वडील यु. टी. फरीद यांच्या निधनानंतर खादर या मतदारसंघातून निवडणूक लढवली. फरीद हे याच मतदारसंघातून चारवेळा आमदार होते.

Karnataka Assembly Speaker Election
Karnataka Politics : 'कर्नाटकमध्ये सिद्धरामय्याच पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार; अडीच-अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही'

सिद्धरामय्या यांच्या २०१३ च्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते प्रथम आरोग्य मंत्री होते आणि नंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते. २०१८ मध्ये काँग्रेस-धजद युती सरकारमध्ये खादर यांच्याकडे गृहनिर्माण आणि शहर विकास ही दोन खाती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com