
Gujarat Election Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) बहुमत मिळालं आहे. भाजपला १५६ तर काँग्रेसच्या (Congress) १७ जागा निवडून आल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये वडगाम मतदार संघात चांगलीच रंगत पाहायला मिळाली. काँग्रेसचे युवा नेते जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांनी ४ हजार ५०० मताने दुसऱ्यांदा मैदान मारत ऐतिहासिक विजय मिळवला.
जिग्नेश मेवाणी हे २०१७ ला आंदोलनातून समोर आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मेवाणी आमदार झाले. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना भाजपचे (BJP) उमेदवार मणीभाई वाघेला यांनी जोरदार टक्कर दिली. तसेच 'आप'चे (AAP) उमेदवार दिल्पेश भाटीया आणि एमआयएमचा (MIM) उमेदवारही रिंगणात असल्याने त्यांची धाकधूकही वाढली होती.
तसेच 'आप', 'एमआयएम'चे उमेदवार रिंगणात असल्याने मेवाणींची मते विभागण्याची शक्यता होती. पण तरी देखील दुसऱ्यांदा मैदान मारत जिग्नेश मेवाणी यांनी विजय मिळवला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लाटेत तब्बल दुसऱ्यांदा चार हजार ५०० पेक्षा जास्त मताने ते निवडून आले आहेत. तर वडगाममधून विजय मिळवल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले आहेत. (Gujarat Election Result 2022)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.