'राष्ट्रपत्नी' विधानावरून अधीर रंजन चौधरींनी द्रौपदी मुर्मू यांची मागितली माफी

"आपला अवमान करण्याचा हेतू नव्हता, बोलताना चुकून तसे शब्द गेले,"
Presidential Election, Draupadi Murmu Latest News
Presidential Election, Draupadi Murmu Latest Newssarkarnama

नवी दिल्ली : गेल्या बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी (adhir ranjan chowdhury)यांनी राष्ट्रपती ऐवजी ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केला व त्याचे पडसाद गुरुवारी लोकसभेत दिसून आले. भाजप व काँग्रेस खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. याबाबत चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची माफी मागितली आहे. (Draupadi Murmu latest news)

अधिर रंजन चौधरी यांच्या या विधानानंतर संसद भवनात मोठा गदारोळ झाला होता. भाजने आक्रम भूमिका घेऊन सोनिया गांधी यांची याबाबत माफी मागावी, अशी मागणी केली होती.भाजपच्या महिला खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा करून एका आदिवासी महिलेचा, देशाच्या सर्वोच्च पदाचा, देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.

अधिर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी मुर्मू यांची माफी मागितली. याबाबत त्यांनी एक पत्र राष्ट्रपतींना पाठवले आहे. "आपल्या तोंडातून चुकून राष्ट्रपत्नी असा उल्लेख झाला, आपला अवमान करण्याचा हेतू नव्हता, बोलताना चुकून तसे शब्द गेले," असे रंजन यांनी पत्रात म्हटले आहे.

अधीर रंजन यांनी मुर्मू यांच्यावर केलेल्या टिप्पण्णीचा राजकीय फायदा भाजपने घेण्याची संधी सोडली नाही. अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितल्यावरही भाजपचे खासदार गप्प बसण्यास तयार नव्हते. भाजपच्या आक्रमक महिला खासदार सोनिया गांधी यांच्या माफीची मागणी करत होत्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रपत्नीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी मुर्मू यांचा अवमान केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर बसवल्याचे काँग्रेसला पाहवत नाही. मुर्मू या काँग्रेसच्या पहिल्या पासून लक्ष्य होत्या. अधीर रंजन चौधरी यांचे हे म्हणणे आदिवासीविरोधी, महिलाविरोधी असल्याचा आरोप त्यांचा होता.

Presidential Election, Draupadi Murmu Latest News
शिवसेनेत २५ वर्षात फक्त वेदनाच मिळाल्या ; तीन टर्म आमदार राहिलेल्या बाजोरियांची खंत

स्मृती इराणी एवढ्यावर थांबल्या नाहीत त्यांनी अधीर रंजन यांच्या या म्हणण्यामागे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे, त्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसलेली पाहावत नाही, असा आरोप केला.

स्मृती इराणी यांच्या आरोपाला अनेक भाजप खासदारांनी जोरजोरात घोषणा देत अनुमोदन दिले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका महिलेवर लैंगिक टिप्पण्णी सहन केली जाणार नाही, काँग्रेस अध्यक्षांनी त्या बाबत माफी मागितली पाहिजे, अशीही मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in