गोव्यात भाजपची कोंडी! काँग्रेसने शपथविधीच्या आधी टाकला डाव

गोव्यात पुन्हा एकदा प्रमोद सावंत पर्व सुरू होत असून त्यांच्या शपथविधीकडे लक्ष लागले आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama

पणजी : गोव्यात (Goa) पुन्हा एकदा प्रमोद सावंत पर्व सुरू होत आहे. भाजप (BJP) नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सावंतांचा शपथविधी उद्या (ता.28) होत आहे. भव्यदिव्य अशा शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीवेळीच मोदींना घेरण्याची रणनीती काँग्रेसने (Congress) आखली आहे. यासाठी काँग्रेसने जाहीरपणे जनतेला आवाहन करण्याची खेळी खेळली आहे.

मागील सहा दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. सीएनजी आणि स्वयंपाकाचा पाईप्ड नॅचरल गॅसही महागला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ सुरू आहे. शपथविधीवेळी काँग्रेसने याच मुद्द्यावरून भाजप आणि मोदींची कोंडी करण्याची खेळी खेळली आहे. काँग्रेसचे आमदार मायकेल लोबो यांनी यासाठी थेट जनतेला आवाहन केले आहे. शपथविधीला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना कार्यक्रमात उभे राहून मोदींना इंधन दरवाढीबद्दल जाब विचारावा, असे जाहीर आवाहन केले आहे. यामुळे शपथविधीच्या कार्यक्रमात इंधन दरवाढीवरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.

लोबो हे आधीच्या भाजप सरकारमध्ये मंत्री होते. निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते कळंगुटमधून विजयी झाले आहेत. लोबो म्हणाले की, इंधन दरवाढीवरून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव मोदींना करुन देण्याची आवश्यकता आहे. यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी उभे राहून थेट मोदींना याबद्दल जाब विचारावा. इंधन दरवाढीला भाजपचा विरोध आहे. मोदींनी ही दरवाढ मागे घ्यावी.

BJP and Congress
शिवसेनेसमोर पेच; प्रमोद सावंतांनी बोलावलं पण मुख्यमंत्री ठाकरे जाणार का?

भाजपने गोव्यात 20 जागा मिळवत पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट त्यांनी घेतली अन् मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा सावंत यांच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय भाजपने घेतला. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ 666 मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण पक्ष नेतृत्वाने सावंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

BJP and Congress
अखेर ठरलं! अखिलेश यादवांनी स्वीकारली मोठी जबाबदारी

गोवा विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि एल. मुरूगन यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. या निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर सर्वांनी सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com