सिध्दूंना झटका; मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय

पंजाबमध्ये पुढील काही दिवसांत विधानसभेची निवडणूक होणार आहे.
सिध्दूंना झटका; मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय
Navjot Singh Sidhu

Sarkarnama

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाब (Punjab) काँग्रेसमधील वाद अजूनही कमी झालेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) हे मुख्यमंत्री पदासाठी प्रय़त्न करत आहेत. निवडणूक (Election) प्रचारादरम्यान आपणच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. पण आता त्यांना पक्षाने जोरदार झटका दिला आहे.

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या राजीनाम्यामागे सिध्दू यांची भूमिका महत्वाची ठरल्याचे मानले जाते. अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडल्यानंतर सिध्दू यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. त्यामुळे ते विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Sidhu) यांच्यावर अनेकदा निशाणा साधतात. पण आता पक्षानेच सिध्दू यांना झटका दिला आहे.

Navjot Singh Sidhu
महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान ; कालीचरण बाबाला अटक

आगामी निवडणुकीसाठी पक्षाने मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा कोण, हे आधीच जाहीर केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सुनिल जाखड यांनीच ही माहिती दिली. पक्ष आगामी निवडणूक संयुक्त नेतृत्वाच्या माध्यमातून लढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील जातीय समीकरणं आणि पक्षातील कलह थांबवणे, हा त्यामागचा उद्देश आहे. कारण पंजाबमधील बडे नेते हे विविध समाजातील आहेत, असे जाखड यांनी सांगितले.

Navjot Singh Sidhu
मलिकांचा फुसका बार; भाजप नेत्यांवर बॉम्ब फुटलाच नाही...

दरम्यान, पंजाबमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. भाजपने नुकतेच काँग्रेसला (Congress) धक्का देत तीन आमदार फोडले आहेत. याचबरोबर माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश करीत राजकीय इनिंग सुरू केली आहे. दिनेश मोंगिया हे 44 वर्षांचे असून, ते मूळचे पंजाबमधील आहेत. त्यांनी आज भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यांना भाजपकडून विधानसभेच्या रिगणात उतरवले जाण्याची चर्चा आहे. मोंगिया यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत.

मोंगिया यांच्यासोबत काँग्रेसचे तीन आमदारही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काँग्रेसचे फतेहसिंग बाजवा, बलविंदरसिंग लड्डी आणि राणा गुरमित सोधी या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फतेहसिंग बाजवा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांचे बंधू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.